श्री राम उत्सव समिती रामनवमीत राम भक्तांना वितरित करणार एक लक्ष रामरक्षा सूत्रराम नवमीच्या महाआरतीत माजी खा. नवनीत राणा यांची राहणार उपस्थिती
AB7, सतीश पवार
श्री राम उत्सव समिती रामनवमीत राम भक्तांना वितरित करणार एक लक्ष रामरक्षा स्तोत्र नवमीच्या महाआरतीत माजी खा. नवनीत राणा यांची राहणार उपस्थिती
अकोला-स्थानीय गांधी चौक परिसरात अनेक वर्षापासून रामनवमीचे राम दरबार व सांस्कृतिक उपक्रम साकार करणाऱ्या श्री राम उत्सव समितीच्या वतीने आगामी रामनवमीच्या पाँच दिवसीय उत्सवात रामभक्तांना एल लक्ष एकशे एक राम रक्षा सूत्र वितरित करून विविध उपक्रमाच्या माध्यमातून ही नवमी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती राम उत्सव समितीच्या वतीने सोमवारी श्री रामदेवबाबा श्री श्यामबाबा मंदिर परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. आगामी दिनांक 6 एप्रिल रोजी येत असलेल्या श्रीराम नवमीत अनेक उपक्रम साकारण्यात येणार आहेत.यात गांधी चौक येथील चौपाटी परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून यावर्षी आकर्षक असा श्री राम दरबार साकार करण्यात येणार आहे.उत्सव हे दि 2 एप्रिल ते 6 एप्रिल पर्यंत होणार असून याचा प्रारंभ 2 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता गांधी चौक येथे राम दरबार स्थापन व पूजन सोहळ्याने होणार आहे. दि 3 ते 5 एप्रिल दरम्यान श्री राम उत्सव मातृशक्ति समितीच्या वतीने अनेक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम,स्पर्धा, बालकांसाठी अमर शहीद गणवेष स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून शहरातील मातृशक्तीच्या विविध मंडळांच्या वतीने नित्य दैनिक आरती होणार आहे.5 अप्रेल रोजी बालकांसाठी देशा करीता सर्वोच्च बलिदान करणारे अमर शहीदांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार असून यात उत्कृष्ट वेशभूषा धारण करणाऱ्या बालकांना आकर्षक पुरस्कार बहाल करण्यात येणार आहेत.दि 6 एप्रिल या राम नवमी दिनी दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव टाल मृदंग चा भक्तीभावात हजारों राम भक्ताच्या उपस्थिति साजरा करण्यात येणार आहे.तसेच रामनवमी दिनांक 6 ला सायंकाळी 7 वाजता गांधी चौक येथे भव्य महाआरती होणार आहे. यात अमरावतीच्या माजी खा.व धर्म रक्षक मा.नवनीत राणा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.हजारो महिला पुरुष राम भक्तांच्या उपस्थितीत ही महाआरती होऊन उत्सवाची समाप्ती होणार आहे.राम उत्सव समितीच्या वतीने दि 31 मार्च रोजी महिलांच्या सौभाग्याचा सण म्हणून गणगौर उत्सव येत असून या दिनी दुपारी 3 वाजता गणगोर घाट,खोलेश्वर येथे गणगौर पूजन होणार आहे. तसेच मातृशक्ती साठी उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी विहंगम सेल्फी पॉईंट साकार करून मातृशक्ती चा स्वागत सोहळा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महानगराचे सांस्कृतिक व धार्मिक प्रतीक असणाऱ्या या रामनवमी उत्सवात रामभक्त महिला,पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सव समितीच्या विविध उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन या वेळी करण्यात आले.या पत्रकार परिषदेत प्रमुख मार्गदर्शक नितिन खंडेलवाल समितीचे अध्यक्ष विक्रांत देशमुख,महामंत्री भरतकुमार मिश्रा महिला शाखा संयोजिका दीपिका ठाकुर, सहसंयोजीका रचना तिवारी,निशा कढ़ी आदी उपस्थित होते.उत्सवास समितीचे राजश्री शर्मा, सुनिता तिवारी,सुमन गावंडे,भाविका मिश्र, रुचिका इंदौरिया,संगीता शर्मा, निशा कागलीवाल,एड स्नेहल साँवल, राखी सोनोने, रेखा शर्मा,आरती दुबे,अनोखी शुक्ला, मोनिका देशमुख,श्रुति सोनोने,सुनिता तिवारी, रेश्मा शहा, तरुणा खिलोसिया,दुर्गा शर्मा,ऊषा मिश्रा, चंदा शर्मा,ललिता वर्मा,वंदना पारोचे,एड ममता तिवारी,स्वाति अग्रवाल,पूनम लखन, आशा मंजुलकर,स्वाति मांडेकर,कीर्ति नवलकार, चंचल रूहाटिया,पुष्पा वानखड़े, वैशाली सोनालेकर समवेत समितीचे वरिष्ठ मार्गदर्शक एड मोतीसिंह मोहता,पवन पाड़िया, रामप्रकाश मिश्रा,संतोष अग्रवाल,कमल अग्रवाल, ओमप्रकाश गोयनका,शैलेश खरोटे,बनवारी बजाज,दिलीप खत्री,विजय तिवारी,राधेश्याम शर्मा,संजय सिसोदिया,संतोष गोयनका, किशोर गुजराती,राजेश मिश्रा,दीपक रूहटिया, अभय बिजवे, पंकज कागलीवाल,संजय शर्मा नर्सरी,राजू शर्मा बालाजी, पुरुषोत्तम अग्रवाल, सुनील करनानी,शशांक जोशी,श्याम पचौरी, पं.श्रीकांत इंदौरिया,मनोज शर्मा, महेंद्र पंडित, अमरीश शुक्ला,संजय शर्मा,भूषण इंदौरिया, विष्णु वर्मा,राजीव शर्मा,निहार अग्रवाल,संदीप बाथो,उमेश लखन,अरविंद पिंटू मिश्रा,प्रियांश खेलोसिया,अंकुर सुरेका,राजेश शर्मा,राहुल अग्रवाल,ऋषिकेश जकाते,शंकर शर्मा, दीपक अग्रवाल,राजेश सोनटक, राजू जोशी,संजय शर्मा,रवि मिश्रा,संजय अग्रवाल राजू डोल्या, जय तिवारी,पंकज टावरी,राहुल लोहिया,दर्पण अग्रवाल,आशू मिश्रा,अमित अग्रवाल,रियांश मिश्रा, निवृत्ति राउत मितांश मिश्रा,सतीश पवार,वीर मिश्रा,दीक्षांत बोरकर, कुणाल ढोरे, चेतन, उज्वल जोशी,विक्रमसिंह चंदेल,अजीत जैन,मौसम अग्रवाल,दीपक खंडारे, विजय अग्रवाल समवेत समितीचे सदस्य मोठ्या संख्येने मेहनत घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.