इफतारी पार्टीचे भव्य आयोजन संपन्न
स्थानिक अकोला येथे 9 मार्च 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता मोमीन पुरा मज्जित ताजना पेठ अकोला गावा ग्रुप मोमीनपुरा मज्जित ताजना पेठ अकोला येथे अकोला समस्त मुस्लिम बांधव वतीने इफतारी पार्टीचे भव्य आयोजन करण्यात आले होते या पार्टीमध्ये राष्ट्रीय एकात्मता मानवी एकता बंधुत्व आणि समानता हाच आमचा संदेश आहे या हेतूने आपल्या देशात विविध आस्था धरणाचा देश आहे सांप्रदायिक सद्भावना जोपासण्यासाठी सर्व धर्माची माहिती असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता बंधुत्व प्रेम जातीय सलोखा वृद्धगत करण्यासाठी व सामाजिक एकात्मताचा प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या इफ तारी पार्टीमध्ये मोठ्या संख्येने हिंदू बंधू मुसलमान बंधू यांचे एकात्मताचे प्रतीक दिसून आले