शासकीय हमी भाव खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदी नोंदणी करिता 31 मे पर्यंत मुदत वाढ – आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नाला यश राज्य शासनाचे आभार
AB7
शासकीय हमी भाव खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदी नोंदणी करिता 31 मे पर्यंत मुदत वाढ – आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नाला यश राज्य शासनाचे आभार
अकोला :-सन 2024- 25 च्या शासकीय हमीभाव खरेदी योजनेसाठी ज्वारी आणि भरडधान्य खरेदी योजने करिता शासनाने 2 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 पर्यंत नोंदणीची मुदत निश्चित केली होती परंतु जिल्ह्यातील अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित झाल्याने आमदार रणधीर सावरकर यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री तसेच विनिता वेद सिंगल प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा यांच्याशी चर्चा करून ज्वारी खरेदी नोंदणी करता मुदत वाढीची मागणी केली होती, त्यांच्या मागणीला यश येऊन शासनाने सदर नोंदणी प्रक्रियेसाठी 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे मुदत वाढ दिल्या बाबतचा शासकीय निर्णय राजश्री सारंग उपसचिव अन्न व नागरी पुरवठा यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेला आहे , खुल्या बाजारामध्ये ज्वारीचे भाव सरासरी 2400 रुपये प्रति क्विंटल असून शासकीय हमीभाव 3173 रुपये प्रति क्विंटल इतका आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारामध्ये कमी भावात ज्वारीची विक्री न करता शासनाच्या हमीभावात ज्वारीची विक्री करावी आणि नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी अशी माहिती आमदार सावरकर यांनी दिली आहे,.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असून न्याय देण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने तसेच बळीराजा चा सन्मान तसेच बळीराजाला केंद्रबिंदू मानून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कठीबद्ध असून गेल्या 75 वर्षात शेतकऱ्याला ज्या पद्धतीने मदतीचा हात द्यायला पाहिजे ते मदत सहकार्य काँग्रेसच्या राज्यात दिले गेले नाही परंतु युती शासनाने कर्तव्याच्या भावनेने शेतकऱ्या विषयी असलेली आपुलकी लक्षात घेऊन अनेक योजना सुरू करून शेतकऱ्याला सुखी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे या प्रयत्नामध्ये अनेक यश मिळवून शेतकऱ्यांची प्रचंड साथ मिळत असून देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहून देशाला आत्मनिर्भर तिकडे नेण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे त्यामध्ये शेतकऱ्याचा व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा वाटा असल्याचीही आमदार सावरकर म्हणाले