[मनपा जन्म – मृत्यू नोंदणी विभागाला आमदार साजिद खान पठाण साहेब. आकस्मिक भेट
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे *आमदार साजिद खान पठाण* यांनी शुक्रवारी सकाळी मनपाच्या नागरी सुविधा केंद्र अर्थात जन्म मृत्यू नोंदणी विभागाला आकस्मिक भेट दिली. अनेक दिवसांपासून या विभागाचे कामकाज ढेपाळले असल्याची ओरड मतदार करत होते. शुक्रवारी सकाळी आकस्मिक भेटी दरम्यान जन्म – मृत्यू नोंदणीचे दाखले, प्रमाण पत्र घेणाऱ्या नागरिकांची मोठी रांग त्यांना निदर्शनास आली तर कार्यालयातील काही कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. यावेळी या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या कर्मचारी वाढ करण्याची मागणी केली तर या पुढे या कार्यालयाबाहेर नागरिकांच्या लागणाऱ्या रांगा कश्या कमी होतील याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.