ताज्या घडामोडी

उठा जागे व्हा संघटित व्हा संघर्ष करा!!

गोंधळी समाजाच्याबैठकीचे आयोजन

 

अकोला स्थानिक लोकमान्य नगर बाळापूर रोड येथील आई तुळजाभवानी गोंधळी समाज सभागृहात दिनांक 19/1/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता गोंधळी समाजाच्या महा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीमध्ये समाजाच्या सर्वानुमते नवीन गोंधळी समाजाची संघटना तयार करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीमध्ये सर्वानुमते विचार विनिमय करून नवीन संघटनेची कार्यकारणी घोषित होण्याची शक्यता आहे गोंधळी समाज हा अकोल्यात व मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असल्याने समाज संघटना मजबूत असावी याकरिता या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे या बैठकीचे आयोजन सर्वश्री प्रकाश पुंडलिक भागवत राजेंद्र तुळशीराम गाडगे अमोल हरिदास गीते मधुकर भिकुजी सोनारगन सुरेश सुखदेवराव बोटे गोपाळ सुधाकर मुदगल संजय सिंगनाथ महादेव धुडे दीपक पुंडलिक अलोट प्रभाकर पाचपोर निलेश हांडे गणेश पाचपोर एडवोकेट महादेवराव नवलखेले राजेश तुळशीराम पेंढारी श्रीराम भगवान पचांगे योगेश पुंडलिकराव गीते यांनी या बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीला सर्व समाज बांधव उपस्थित रहावे असे आवाहन सर्वांनी केलेले आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.