ताज्या घडामोडी

आयुष्याच्या वळणावर कुणीही एकटे पडू नये, म्हणून…!घटस्फोटित, विधवा, विधुरांचा होणार पुनर्विवाह; देशमुख समाज महिला मंडळाचा पुढाकार

AB7, सौ वनिता येवले

आयुष्याच्या वळणावर कुणीही एकटे पडू नये, म्हणून…!घटस्फोटित, विधवा, विधुरांचा होणार पुनर्विवाह; देशमुख समाज महिला मंडळाचा पुढाकार!!!

अकोला दि.९ . आयुष्याच्या वळणावर कोणीही एकटे पडू नये, त्यांना जोडदारांची साथ असावी, एकमेकांच्या सोबतीने आयुष्य घालविता यावे याकरिता देशमुख महिला समाज मंडळाच्या वतीने पुनर्विवाह परिचय मेळाव्यात विवाहासाठी इच्छुकांनी परिचय करून दिला. या मेळाव्यातून एकल, घटस्पोटीत, विधवा, विधुरांचा पुनर्विवाह करण्यात येणार असून दोन कुटुंबाना एकसंघ करण्यास देशमुख समाज महिला मंडळाच्या पुढाकार राहणार आहे. जागतिक महिला दिनाच्या पावन पर्वांवर होटेल सेंटर प्लाझा येथेजुन्या चाली-रीतीला तिलांजली !देशमुख समाज महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुनर्विवाह परिचय मेळाव्यात जुन्या चालीरीती रूढी परंपरांना गीतांजली देत नव्याने संसार उभा करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. या मेळाव्यातून घटस्पोटीत, विधवा, विधुर यांचा पुनर्विवाह करण्यात देणार असल्याने देशमुख समाज महिला मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.देशमुख, मराठा, पाटील समाजातील घटस्पोटीत, विधवा, विधुर यांच्यासाठी पुनर्विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात देशमुख नहिला मंडळ, यांनी जुन्या चाली-रीतीला तिलांजली देत प्रथमच एकधाडसी पाऊल उचलले असून काही कारणास्तव मुला मुलींचे लब्राला उशीर झाला असेल व ते मेळ्याव्यातील घटस्पोटीत, विधवा, विधुर समवेत स्वइच्छेने विवाह करण्यास तयार असतील अशा मंडळीचे देखीलमेळाव्यात 200 पेक्षा अधिकांचा परिचयदेशमुख समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुनर्विवाह परिचय मेळाव्यात माजलगाव, संभाजीनगर, पुणे, नदिड, नागपूर, चंद्रपूर या भागातून उपस्थिती लाभली होती. यावेळी विवाहासाठी इच्छुक असलेल्या 200 पेक्षा अधिक घटस्पोटीत, विधवा, विधुरानी आपला परिचय करून दिला. या परीचयातून उपस्थितांनी एकमेकांशी ओळख करू घेत विवाहासाठी अनुकूल असलेल्या परिवारांशी संपर्कही साथला आहे.पुनर्विवाह परिचय मेळ्याव्यात आपला परिचय करून दिला. यादरम्यान विवाह इच्छुकांनी आपला परिचय करून देतांना विवाहासाठी असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी नहिला, युवतीचाही सत्कार करण्यातआला. या पुनर्विवाह परिचय मेळ्याव्याकरिता देशमुख समाज महिला मंडळांच्या अध्यक्ष राजश्री देशमुख, सचिव स्वप्राली देशमुख, उपाध्यक्ष नयना देशमुख, कोषाध्यक्ष प्रतिभा देशमुख, जेष्ठ सल्लागार कविता ढोरे,कल्पना देशमुख, संजीवनी देशमुख, सीना देशमुख, पुष्पा देशमुख, शुभांगी देशमुख, शिल्प देशमुख, उज्वला देशमुख, शीतल देशमुख, संध्या देशमुख, पूजा देशमुख, अस्मिता देशमुख, अनुराधा देशमुख, इंदू देशमुख, मोनल देशमुख, संध्या देशमुख, पौर्णिमा देशमुख, श्रद्धा देशमुख, डॉ. जय देशमुख, पल्लवी, शिल्पा देशमुख, उज्वला देशमुख, देवयानी देशमुख, अश्विनी देशमुख, मनीषा देशमुख, विना देशमुख, जयश्री देशमुख, सुनीत देशनुव, अनधा देशमुख, संध्या देशमुख, साथना देशमुख आदींसह देशमुख समाज महिला मंडळांच्या पदाधिकान्यांनी पुढाकार घेतला.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.