ताज्या घडामोडी

प्राध्यापक तुकाराम बिडकर अनंतात विलीनसर्वच राजकीय पक्षांसोबतच बिडकर यांचे चांगले संबंध – छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या शोक संवेदना

प्राध्यापक तुकाराम बिडकर अनंतात विलीनसर्वच राजकीय पक्षांसोबतच बिडकर यांचे चांगले संबंध – छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या शोक संवेदना,

अकोला: जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचं काल अपघाती निधन झाले. आज कुंभारी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ सुद्धा उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. दरम्यान भुजबळ यांनी बोलताना त्यांचे सर्वच राजकीय पक्षांसोबतच चांगले संबंध असल्याचं म्हणत बिडकर यांच्या सारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावल्याने मोठा नुकसान झाल्याचं ही ते म्हणाले. त्यांच्या जाण्याने संघटनेची पोकळी निर्माण झाली असल्याचंही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री आकाश फुंडकर माजी मंत्री तथा समता परिषदेचे प्रमुख व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी मंत्री डॉक्टर रणजीत पाटील, आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, मनीष हिवराळे, आशिष पवित्रकार, माजी आमदार नारायण गव्हाणकर, राजकुमार मूलचंदानी, ॲड मोतीसिंह मोहता, श्री रोहाटिया, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, प्रकाश तायडे, आमदार हरीश पिंपळे, वसंतराव खोटरे, संग्राम गावंडे, जयंत मसने, अनिल मालगे, महेश गणगणे, बळीराम शिरस्कार यांच्यासह स्व. तुकाराम बिडकर यांच्या पत्नी राधा बिडकर, भाऊ शत्रुघ्न बिडकर, श्रीकृष्ण बिडकर, प्रकाश बिडकर आदींसह मोठ्या संख्येने सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी बिडकर यांचा मित्रपरिवार नातेवाईक चहाते कार्यकर्ते जय बजरंग परिवार क्रीडा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अकोला विद्यार्थी दिशेपासून सामाजिक कार्याचा वसा घेतला राजकीय, धार्मिक सामाजिक, व सांस्कृतिक,कंला, शैक्षणिक क्रीडाक्षेत्र क्षेत्रामध्ये काम सुरू करून समाजातील वंचित पिढी त्यांना आधार देण्याचं काम केलं आदिवासी मुलांना मलखांब क्रीडा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्याचे काम केलं त्यामुळे विद्यार्थी परिषदेने दखल घेऊन सर्वात आधी पहिला पुरस्कार त्यांना चाळीस वर्षांपूर्वी दिले जिल्हा परिषद विधानसभा तसेच विदर्भ वैधानिक महामंडळ, समता परिषद ओबीसी चळवळ मध्ये त्यांचा महत्वपूर्ण योगदान आहे महाराष्ट्राने जिल्ह्यातील ओबीसी चळवळला त्यांच्या अपघाती निधनाने फार मोठा नुकसान झाला असून शब्दाला जगणारा मित्रत्वाला जपणारा ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांचे चांगले मित्र गमावले अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एडवोकेट आकाश सुनिता ताई भाऊसाहेब फुंडकर यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या निधनाने न भरून निघणारी हानी झाली असून बिडकर परिवाराचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक क्रीडा कला संस्कृती अशा अष्टपैलू आयामी व्यक्तिमत्त्वाच्या निर्णयाने महायुतीचा नेता यांच्या अपघाती निर्णयाने व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी येऊन अनेक गप्पा राजकीय सामाजिक गप्पा मारताना वर्हाडी भाषेची पकड असणारा एक एक सच्चा मार्गदर्शक यांच्या दुखद निधनाने अकोला जिल्ह्याची फार मोठी हानी झाली आहे त्यांना अकोला जिल्हा व बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने ओबीसी समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे कामगार मंत्री व अकोला जिल्हा पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. बिडकर परिवाराला दुःख सहन करण्याची ईश्वर ताकद देऊन त्यांना या दुखातून सावरण्याची अशी प्रार्थनाही नामदार फुंडकर यांनी केली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.