अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री ना.मुरलीधर मोहोळ यांना पेहलगाम निषेध पत्र सादर करताना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेन्द्र वनारसे व सर्व पदाधिकारी….*
AB7वृत्तसंकलन:संभाजी खाडे, प्रदेश प्रवक्ते
*अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री ना.मुरलीधर मोहोळ यांना पेहलगाम निषेध पत्र सादर करताना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेन्द्र वनारसे व सर्व पदाधिकारी..
..आज पुणे गोंधळी सांस्कृतिक भवन’ संघटना कार्यालयात काश्मीर राज्यातील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बैठक संपन्न झाली.प्रथम भारतमाता प्रतिमा पूजन संघटनेचे जेष्ठ नागरिक आघाडी संघटक श्री सुभाषराव जाधव ( सेवानिवृत्त पोलीस अधिकारी) यांच्या हस्ते करुन पदाधिकाऱ्यांनी आई जगदंबेची दिवटी प्रज्वलित केली .यावेळीसंबळ,सूर,झांज वाद्यांच्या गजरात आरती झाली.त्यानंतर हल्ल्यात मरण पावलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.बैठकीत पदाधिकाऱ्यांनी तिव्र शब्दात काश्मीर राज्यातीलअतिरेकी भ्याड, अमानवी कृत्याचा व प्रवृत्तीचा निषेधकेला.यावेळी केंद्रीय व पुणे महानगर कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीऩंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देताना संघटनेचे राजेंद्र वनारसे,राहुल ढेंबे,परेश गरुड, हरिष पाचंगे, सुभाष जाधव आदि छायाचित्रात दिसत आहेत. वृत्तसंकलन:संभाजी खाडे, प्रदेश प्रवक्ते