विवाहितेची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी
सासऱ्यासह दोघांकडून अर्वाच्य शिवीगाळ घटस्फोटासाठी दबाव
अमरावती : शहरातील एका वैद्यकीयमहाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या ३० वर्षीय विवाहितेला पतीसह सासरच्या मंडळीकडून घटस्फोट न दिल्यास जिवे मारण्याची तसेच पहिल्या रात्रीची अंतरंग छायाचित्रे, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी विवाहितेने आधीच कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार पोलिसांत दाखल केली. धमकी मिळाल्यानंतर पुन्हा नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सासरा व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिस सूत्रांनुसार, सुरेश काशीरामजी वानखडे (५४, रा. राजाराम मेंघेनगर, कौलखेड, अकोला) व रमेश श्यामराव सुरजुसे (५८, रा. राजाराम मेंघेनगर, कौलखेड, अकोला) अशी गुन्हे दाखल झालेल्या सासरा व त्याच्या मित्राची नावे आहेत.तक्रारदार विवाहितेचा अकोलाये थील अक्षय सुरेश वानखडे याच्याशी ८ डिसेंबर २०२१ रोजी विवाह झाला. पेट्रोल पंप असलेल्या घरी नांदायला जाणार म्हणून माहेरचे सर्व जण आनंदात होते. मात्र, पतीसह सासू-सासरे, दीर-नणंद यांच्या कौटुंबिक हिंसाचाराचा जाच तिला सहन करावा लागला. त्यातच अमरावती येथे नोकरीच्या ठिकाणी राहणेदेखील त्यांना सहन होत नव्हते. जाच असह्य झाल्यावर विवाहितेने सासरच्या मंडळीविरुद्ध नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.नांदगाव पेठ पोलिसात २५ एप्रिल रोजी दोघांविरुद्ध गुन्हे यापूर्वीही सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रारदरम्यान, २१ एप्रिल रोजी विवाहिता तिचे काका व मैत्रिणीसोबत असताना तिला रमेश सुरजुसे याचा मोबाइलवर कॉल आला. वानखडे कुटुंबाला नोटीस दिल्याबद्दल त्याने अर्वाच्य शिवीगाळ करीत तिचा पाणउतारा केला. यानंतर सासरा सुरेशने कॉल केला. घटस्फोट न दिल्यास तुझ्या पतीने काढलेली पहिल्या रात्रीची अंतरंग छायाचित्रे, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. एवढेच नव्हे तर गुंडांच्या मदतीने संपविण्याची धमकी अक्षयनेदेखील दिल्याचे तो यावेळी म्हणाला. यामुळे हादरलेल्या विवाहितेने नांदगावपेठ पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली.