श्री शिवाजी विद्यालय निंबा येथे छंद शिबिर
अकोला-श्री शिवाजी विद्यालय निंबा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छंद शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निंबा गावचे पोलीस पाटील श्री प्रमोद बापू देशमुख हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पद विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री विनोद धांडे सर यांनी भूषविले. तसेच याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक नितीन पाटील , श्री अविनाश सानप तसेच श्री सावंत सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख तसेच श्रीधर बापू देशमुख उपाख्य मालक यांच्या प्रतिमांचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली व कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले त्यानंतर पहिल्या दिवसाची सुरुवात योग व प्राणायाम करून करण्यात आली यावेळी विद्यालयातील श्री खचकड सर व श्री उगले सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योग प्राणायामाचे संबंधित मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला त्यानंतर सुरू झालेल्या दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली व त्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले . चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे साठी कलाशिक्षक श्री विनोद मोरे व श्री जितेंद्र सुळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर छंदशिबीराच्या पुढील भागात योग व प्राणायाम,हस्तकला, व्यक्तिमत्व विकास, गीत गायन, नृत्य ,शारीरिक कसरती, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण जागृत करण्यात मदत होईल व या छंदाद्वारे त्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत मिळेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. बाळसराफ मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्री अनिल बढे सर यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते