क्राईम स्टोरी

“जिवंत राहायचे असेल तर…”, सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा धमकी

सलमान खानला गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ संपता संपत नाही. अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. सलमान खानने माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्यात येईल, असा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने सलमान खानला ही धमकी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री एक धमकीचा फोन आला होता. यावेळी धमकी देणाऱ्याने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीवजा मेसेज दिला आहे. मी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलत आहे, असा दावा त्याने केला आहे. जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात येऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावे. जर त्याने हे केले नाही तर आम्ही त्याला जीवे मारु. आमची गँग आजही सक्रिय आहे, असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळालेल्या धमकीच्या मेसेजनंतर वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. विशेष म्हणजे सलमान खानला गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. तसेच याप्रकरणाचा तपासही सुरु आहे.

दरम्यान, अभिनेता सलमान खान हा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमान खानने 1998 मध्ये काळविटाची शिकार केली होती, असा आरोप आहे. बिश्नोई समाज हा काळविटाची पूजा करतो. यामुळे लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाला होता.

यानंतर दसऱ्याच्या दिवशी सलमान खानच्या निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमागे बिश्नोई टोळीचा हात असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. यानंतरही सतत सलमान खानला धमक्या मिळत आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.