फेब्रुवारी २०२५ अखेर) खरेदीची मुदत वाढवून द्यावी- आमदार रणधीर सावरकरांनी राज्याचे मूख्य मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या कडे केली आहे,
राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस न्याय देतील असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला.
अकोला
सोयाबीन खरेदी ची मुदत वाढ करण्यात यावी अशी मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री जयकुमार रावळ, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे करून शासनाने खरेदी सोयाबीन करताना अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करण्याचा जो लक्षाक, केला होता व नोंदणी झाली आहे त्याप्रमाणे शासनाने खरेदी केली नाही पूर्ण खरेदी झाल्याशिवाय व शेतकऱ्यांचा पूर्ण सोयाबीन घेतल्याशिवाय खरेदी बंद करू नये 31 जानेवारी ची मुदत 28 फरवरी पर्यंत करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे करून सहकार सचिव पणन महासंघाचे अधिकार्यांशी त्यांनी संवाद साधून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
शासनाने अकोला जिल्ह्यासाठी सोयाबीन खरेदी करीता वाढीव ल आठक्षांक तसेच किमान १ महिना (माहे
फेब्रुवारी २०२५ अखेर) खरेदीची मुदत वाढवून द्यावी- आमदार रणधीर सावरकरांनी राज्याचे मूख्य मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या कडे केली आहे,
अकोला जिल्ह्यात शासकीय हमी भाव खरेदी योजने अंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडून अकोला जिल्ह्यात एकुण २८,९०२ सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी नोंदणी केली असून, पैकी १८,४४४ शेतक-यांना विक्रीकरीता संदेश पाठविण्यात आलेले आहे, त्यापैकी आज तारखेस फक्त १५,२४३ शेतक-यांनी प्रत्यक्षात सोयाबीनची विक्री केलेली आहे. म्हणजेच १३,६५९ शेतक-यांकडून (४७ टक्के) अद्याप सोयाबीन विक्री शेष असल्याने सोयाबीन विक्री बाबतची मुदत तसेच लक्षांक वाढविणे आवश्यक आहे. अशाच प्रकारची परिस्थीती इतरही सोयाबीन खरेदी यंत्रणांची आहे.
अकोला जिल्ह्यासाठी ६.५८ लक्ष क्विंटल इतका खरेदीचा लक्षांक शासनाकडून ठरवून देण्यात आला होता. यापैकी आज दिनांकास (२१ जानेवारी २०२५) ५.८९ लक्ष क्विंटल खरेदी करण्यात आली असून लक्षांकापैकी फक्त ६९ हजार क्विंटल लक्षांक शेष आहे. प्राप्त परिस्थीती नुसार प्रत्यक्षात अकोला जिल्ह्यात अद्यापही सुमारे २.५० ते ३.०० लक्ष क्विंटल सोयाबीन शेतक-यांकडे विक्रीच्या प्रतिक्षेत आहे.
सोयाबीन विक्री करीता शासनाने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत मुदत सुध्दा दिली असली तरी उपरोक्त सर्व परिस्थीती लक्षात घेता, अकोला जिल्ह्यासाठी सोयाबीन खरेदी लक्षांक सुमारे ३.०० लक्ष क्विंटल पर्यंत वाढवून देण्या सोबत खरेदीची मुदत सुध्दा किमान १ महीना आहे. फेब्रुवारी २०२५ अखेर वाढविणे आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस न्याय देतील असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला.