अकोल्यात पाणी प्रश्नावरून तणाव ! महापालिकेत शिवसैनिकांची तोड
अकोला:शहरात आजपासून पाचव्या दिवशी पाण्याचे नियोजन महापालिका करत असताना आज महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड करत प्रशासनाला जाब विचारला. जलप्रदाय विभागात अचानक शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अकोला शहरात पाणी प्रश्नाने गंभीर वळण घेतले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते मलकापूर भागातील पाणी टंचाईमुळे आक्रमकआहेत. माजी नगरसेवक मंगेश काळे, राहूल कराळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कार्यकर्त्यांनी जलप्रदाय विभागात तोडफोड केली. महानगरपालिकेच्या जलप्रदाय झाले विभागाच्या खुर्त्यांची तोडफोडकरण्यात आली असून, मलकापूर परिसरात दररोज सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे. गळ्यात नळ घालून आलेल्या कार्यकर्त्यांनी थेट खुर्थ्यांची फेकाफेक करत तोडफोड केली.