हनुमंत रायाची दासत्व भक्तीतूनच परोकाराचे विचार घ्या..!ह भ प प्रमोदजी महाराज पांडे
AB7
हनुमंत रायाची दासत्व भक्तीतूनच परोकाराचे विचार घ्या..!ह भ प प्रमोदजी महाराज पांडे
अकोला स्थानिक शिवसेना वसाहत येथे राजूबाबा सभागृह राजू बाबा चौक येथे हनुमान मंदिर स्थित सकल संत विचार प्रचारक ह भ प प्रमोदजी पांडे यांचे हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकाळी4 ते 6 वाजेपर्यंत हरिकीर्तन ठेवण्यात आले होते कीर्तन प्रसंगी त्यांनी हनुमंत रायाची दासत्व भक्ती मधून परोपकार करण्याची कला तरुणांनी घ्यावी असे तरुण पिढीला प्रबोधन पर सांगितले यावेळी समस्त भाविक भक्त कीर्तनाला उपस्थित होते तबलावादक रामकृष्ण कुचर हार्मोनियम वादक रामकृष्ण मुंडे गावंडे हार्मोनियम वादक चौधरी टाळकरी नामदेव कपाळे संतोष रत्नपारखी किशन घोगरे कंगले व प्रकाश कशनेकर परिसरातील भक्त मंडळी यावेळी उपस्थित होते. शैलेंद्र वानखडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे.