तीर्थदर्शन योजनेत ८३४ भाविक अयोध्या दर्शनाकरिता विशेष रेल्वेने रवाना आ. साजिद खान यांनी दिली हिरवी झेंडी
AB7
तीर्थदर्शन योजनेत ८३४ भाविक अयोध्या दर्शनाकरिता विशेष रेल्वेने रवाना आ. साजिद खान यांनी दिली हिरवी झेंडी
अकोला : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत जिल्ह्यातील ८३४ भाविकांना अयोध्या दर्शनाचा लाभ देण्यात आला. अयोध्येसाठी हे यात्रेकरू अकोला रेल्वेस्थानकावरून शुक्रवारी विशेष रेल्वेने रवाना झाले. यावेळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आ. साजिद खान यांनी विशेष रेल्वेला हिरवी झेंडी देत निरोप दिला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत अकोला जिल्ह्यातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असलेल्या एकूण ८३४ तीर्थ यात्रेकरूंचा समावेश होऊन अयोध्या येथे चार दिवसांकरीता तीर्थदर्शनाचा लाभ मिळाला आहे. तीर्थयात्रेचा कालावधी ११ ते १५ एप्रिल असा निश्चित करण्यात आला आहे. विशेष रेल्वे गाडीने भाविक रवाना झाले. यावेळी आ. साजिद खान पठाण यांनी या विशेष रेल्वेला आ. साजिद खान पठाण यांनी हिरवी झेंडी दिली. यावेळी समाजकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी माया केदार, सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांसह समाजकल्याण व अकोला रेल्वे स्थानकाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. भाविकांना रेल्वेस्थानकावर ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रवासासाठी आवश्यक साहित्य, पाणी व भोजन यांचे वाटप झाले. वैद्यकीय पथक सोबत देण्यात आले. स्वयंसेवक म्हणुन यात्रेकरूंसमवेत समतादुत व कार्यालयातील कर्मचारी यांना त्याचेसोबत पाठविण्यात आले आहे.