ताज्या घडामोडी

अमरावती – मुंबई विमानसेवासंकेतस्थळावर वेळापत्रक; सोमवार, बुधवार, शुक्रवारी करता येणार प्रवास

AB7

आता आठवड्यातून तीन दिवस अमरावती – मुंबई विमानसेवासंकेतस्थळावर वेळापत्रक; सोमवार, बुधवार, शुक्रवारी करता येणार प्रवास

अमरावती : अमरावती विमानतळाचे १६ एप्रिल रोजी लोकार्पण होत असून, आठवड्यातून तीन दिवस मुंबई विमानवारी करता येणार आहे. मंगळवारी अलायन्स एअर लाइन्सच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या आठवड्यातून तीन दिवस अमरावतीकरांना विमानाने प्रवास करता येणार आहे.बहुप्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाच्या लोकार्पणाचा मुहूर्त साधला आहे. अमरावतीचे विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी गेमचेंजर ठरणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) तर्फे उडान योजनेंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर उद्योग, व्यवसाय आणि प्रवाशांसाठी सुवर्णद्वार ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एमएडीसीने पुन्हा एकदा अशक्य शक्य करून दाखवले आहे. आता आठवडाभराची प्रतीक्षा आहे.असे आहे प्रस्तावित विमानाचे वेळापत्रकमुंबईहून निघणार दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी, अमरावतीत पोहोचणार ४ वाजून १५ मिनिटांनीअमरावतीहून निघणार सायं. ४ वाजून ४० मिनिटांनी, मुंबई येथे पोहोचणार सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनीआठवड्यातून तीन दिवस : सोमवार, बुधवार, शुक्रवारअन् संकेतस्थळावर झळकले ‘एव्हीटी’अमरावती विमानतळाला आयएटीए कोड मिळाला आहे. आयएटीए प्रमाणन प्रवासी संस्थांना विमान कंपन्यांच्या वतीने विमान तिकिटे जारी करण्याची परवानगी देते. त्यानुसार मंगळवारी अलायन्स एअर लाइन्सच्या संकेतस्थळावर अमरावती विमानतळाचा आयएटीए कोड ‘एव्हीटी’ म्हणून झळकला.एमएडीसीच्या संचालकांचे कलेक्टरांना पत्रअमरावती विमानतळाचे बुधवार, १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचे पत्र महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक स्वाती पांडे यांनी मंगळवारी उशिरा जिल्हाधिकारी सौरभकटियार यांच्या नावे पाठविले. अलायन्स एअर लाइन्सचे विमान हे मुंबई विमानतळाहून सकाळी ८:४५ वाजता अमरावतीकडे रवाना होईल.विमानतळाची धावपट्टी १८५० मीटर लांबी अन् ४५ मीटर रुंदीचीमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरा व्यावसायिक विमानतळ आहे. या विमानतळाने ३८९ हेक्टर क्षेत्र व्यापले. १८५० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे. सध्या नाईट लैंडिंग सुविधा उभारण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. अमरावती विमानतळाहून अलायन्स एअर लाइन्सची एटीआर ७२ मुंबई विमानसेवा सुरू होत आहे. उडान अंतर्गत व्यावसायिक विमान सेवेसाठी अलायन्स एअर लाइन्ससोबत करार झाला आहे.आमदार-खासदारांची उपस्थितीप्रादेशिक संपर्क योजना (आरसीएस) उडानअंतर्गत व्यावसायिक विमानसेवा एटीआर-७२ अमरावती विमानतळाहून सुरू होत आहे. या लोकार्पण सोहळ्याला आमदार, खासदारांसह प्रशासकीय अधिकारी, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.