ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठांना 25 कोटी रुपये संशोधनासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी आज सभागृहात केली.

AB7

अकोलारा-सायनिक शेती एवजी नैसर्गिक शेती याकडे प्रोत्साहन देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे पीक कमी दरात आरोग्याला चांगल्या सोबत कमी पाण्यात उपलब्ध होणारे पीक वाढ ूच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रयत्न करावे व यासाठी कृषी विद्यापीठांना  25 कोटी रुपये संशोधनासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी आज सभागृहात केली.

 

सभागृहात सत्तारूढ पक्षाकडून सभागृहामध्ये 293 च्या प्रस्तावावर आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याच्या कृषी धोरणामध्ये कसे बदल करणे आवश्यक आहे, राज्याच्या विकासाकरिता केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्याचा निती आयोग तयार करण्यात यावा ,रासायनिक शेतीमुळे माणसाचे आरोग्यावर जे विपरीत परिणाम झाले आहेत त्याकरिता पोषण आहारामध्ये कसा बदल करणे आवश्यक आहे याबाबत आमदार रणधीर सावरकर यांनी चर्चेदरम्यान अभ्यासपूर्ण टिप्पणी केली. सन 2023 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष साजरे केले मिलेट म्हणजे भरड धान्य गहू ज्वारी ‌तांदूळ हे मेजरमेंट सध्या आपले खाद्य म्हणून वापरतो परंतु हजारो वर्षांपूर्वीपासून भारत देशात एकूण १६ प्रकारचे मिलेटचे उत्पादन घेतले जाते जगाच्या एकूण उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन हे फक्त भारतात घेतले जाते, मिलिट चे उत्पादन डोंगरी भागात प्रामुख्याने घेतले जाते , त्यामुळे लहान शेतकऱ्यांना, आदिवासी शेतकऱ्यांना ,अशा एकूण अडीच कोटी शेतकऱ्यांना देशांमध्ये मिलेट उत्पादनामध्ये सहभागी करून घेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी व्यक्त केलेला आहे ,या पिकाला हलकी जमीन कमी पाऊस खतांची आवश्यकता नाही हवामानासोबत जुळून घेण्याची ताकद असून या मिलेट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषण तत्व असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. आपल्या 37 मिनिटाच्या भाषणामध्ये विरोधकांना अनेक चिमटे घेऊन शेतकरी व समाज हिताचे अनेक निर्णय महायुती घेत असून यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगून नैसर्गिक शेती चे महत्व विशद करून त्यामुळे होणारेरोगमुक्त होण्याकरिता पोषण आहारामध्ये बदल करण्याची ही वेळ असून रासायनिक शेती कमी करून नैसर्गिक शेतीकडे आपल्याला वळता येईल का? याकरिता शासनाने आणि कृषी विद्यापीठांनी अभ्यास करावा अशी महत्वपूर्ण सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाला केली आहे.

देशातील मखाना बोर्डच्या धरतीवर राज्यात मिलेट बोर्डची स्थापना करावी आणि त्याकरिता राज्य शासनाने मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येक कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 25 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून या मिलेट्सचे संरक्षण संवर्धन संशोधन व उत्पादन करता येईल, अशी महत्वपूर्ण मागणी रणधीर सावरकरांनी शासनाला केली आहे,.

तसेच शेतकऱ्याच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने सरकार करीत असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी सभागृहामध्ये माहिती सरकारची भूमिका मांडली आपल्या 37 मिनिटांमध्ये शेती विषय माहिती देऊन शेतकरी सर्वसामान्य नागरिक तसेच वेदना संवेदना सरकारच्या योजना ची माहिती सभागृहामध्ये चर्चा करून आपल्या अभ्यासू वृत्तीचा परिचय दिला. सभागृहामध्ये सतत वेगवेगळे विषय मांडून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा लोकशाही मधील महत्त्वाचा आयुद्धाचा वापर करून वेगवेगळ्या विषयाला त्यांनी आयाम दिला. सभागृहामध्ये चर्चा मध्ये भाग घेऊ न उत्कृष्ट वक्ते अभ्यासू नेतृत्व म्हणून शेतकरी व सर्वसामान्यांचे नेते म्हणून आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आमदार सावरकर हे शेतकऱ्याच्या विषयाचे अभ्यासक असल्याचे म्हटले आहे हेच त्यांच्या शेतकऱ्या विषयी असलेली तळमळ यावरून दिसते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.