अकोल्यात हिंदू नववर्ष स्वागतयात्रा!शहरात ठिकठिकाणी स्वागत : राजराजेश्वर मंदिरातून सुरुवात, बिर्ला राममंदिरात समारोप
AB7
जय श्रीरामच्या जयघोषात निघाली अकोल्यात हिंदू नववर्ष स्वागतयात्रा!शहरात ठिकठिकाणी स्वागत : राजराजेश्वर मंदिरातून सुरुवात, बिर्ला राममंदिरात समारोप
अकोला : गुढीपाडवा अर्थात चैत्र शुक्ल प्रतिपदेनिमित्त, हिंदू नववर्षाच्या स्वागतार्थ संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने उत्साहात स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता, राजराजेश्वर मंदिरातून यात्रा शुभारंभ करण्यात आला. जय श्रीरामचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह ही यात्रा शहरभर मार्गक्रमण करत बिर्ला राममंदिर येथे महाआरतीने समारोप झाला.प्रारंभी राजराजेश्वर मंदिरात पोलिस अधीक्षक बच्चनसिंह, रा.स्व. संघाचे विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, स्वागत समिती अध्यक्ष अरविंद देठे, समितीचे उपाध्यक्ष डॉ. पार्थसारथी शुक्ल, मंगेश वानखडे, रामप्रकाश मिश्रा, डॉ. अभिजित नालट, डॉ. प्रवीण चव्हाण, मधुर खंडेलवाल, विनोद देव, नीलेश देव, स्वानंद कॉडोलिकर, राजेश मिश्रा आदींनी राजराजेश्वराची मंत्रोपचारात पूजा, महाआरती केल्यानंतर स्वागतयात्रेला सुरुवात करण्यात आली. यात्रेत पारंपरिक वेशभूषा, केशरी फेटे घालून नागरिक सहभागी झाले होते. रॅलीमध्ये डॉ. आर. बी. हेडा, अॅड. गिरीश होते. देशपांडे, हरीश आलिमचंदानी, पुरुषोत्तम मालाणी, महेश जोशी, अॅड. मोतिसिंह मोहता, माजी नगरसेवक बाळ टाले, विजय इंगळे, प्रकाश घोगलिया, हेमेंद्र राजगुरू, डॉ. माधव देशमुख, योगेश अग्रवाल, समीर मुलमुले, बाबासाहेब पाठक, दीपक मायी, रामेश्वर फुंडकर, सुधाकर अंबुसकर, निनाद कुळकर्णी, चंदा जयस्वाल, आशा खोकले, चित्रा बापट, अर्चना शर्मा, निकेश गुप्ता, पंकज सादराणी, प्रशांत पाटील, अभिजित आटतदेकर आती सरभागी याले होतेजठारपेठ चौकात ढोल पथकाद्वारे जल्लोषात स्वागतजठारपेठ चौकात स्वराज्य मित्र मंडळातर्फे संकल्प ढोल पथकाने जोरदार वादन करून स्वागत यात्रेचे स्वागत केले. समितीचे अध्यक्ष नितीन बाठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश गोखले, अजय शास्त्री, अमोल गोरे, नीलेश पवार आदी उपस्थितआमदार सावरकरांकडून स्वागतभव्य दुचाकी स्वागत यात्रेचे सातव चौकात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी भव्य स्वागत केले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जयंत मसने, प्रकाश शेगोकार, शंकरराव वाकोडे, माजी नगरसेवक सागर शेगोकार, हरीश काळे, भोला परदेशी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांची सपत्नीक महाआरतीस्वागत यात्रेचा बिर्ला राम मंदिरात नीलेश देव मंडळातर्फे आयोजित रामरक्षास्तोत्र पठणाने आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार, डॉ. जुईली कुंभार यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची महाआरती करून समारोप करण्यात आला. याठिकाणी हर घर दुर्गा अंतर्गत मुली, युवतींनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी जयंत सरदेशपांडे, राजू गुण्णलवार, भास्कर बैतवार, गणेश मैराळ, रश्मी देव, राजू कनोजिया उपस्थित होते.अधिवक्ता परिषदेतर्फे स्वागतटॉवर चौकात रविवारी सकाळी संस्कृती संवर्ध समितीच्या स्वागत यात्रे पुष्पवर्षाव करून स्वाग करण्यात आले.यावेळी अधिवक्तापरिषदेचे पदाधिकारी 3 सत्यनारायण जोशी, अॅ विजय भांबेरे, अॅड. आरि फुंडकर, अॅड. आनंद गो अॅड. किरण खोत आदी उपस्थित होते.पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या हस्ते शुभारंभराजराजेश्वर मंदिरात पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या हस्ते राजेश्वराची महाआरती करून, संस्कृती संवर्धन समितीच्या स्वागत यात्रेचा शुभारंभकरण्यात आला. यावेळी बच्चनसिंह है पारंपारिक वेशभुषेत स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबतच शहराचे पोलिस उपअधीक्षक सतीशभाजप महिला आघाडीतर्फे पुष्पवषरणपिसे नगरातील बारा ज्योर्तिलिंग मंदिरासमोर भाजप महिला आघाडीकडून सुहासिनीताई थोत्रे, मंजुषाताई सावरकर, समीक्षाताई धोत्रे, माजी महापौर सुमनताई गावं? अर्चना मसने आदींनी पुष्पवष करून स्वागत केले.