लोककलावंतांना अन्नसुरक्षा योजनेमधून अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा तसेच रेशनकार्ड इष्टांक प्रणाली त्वरित सुरू करण्यात यावी.* *- संदीपकुमार बोरकर*
AB7
*लोककलावंतांना अन्नसुरक्षा योजनेमधून अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा तसेच रेशनकार्ड इष्टांक प्रणाली त्वरित सुरू करण्यात यावी.* *- संदीपकुमार बोरकर* 
आज दिनांक 20/5/2025 रोजी राष्ट्रीय लोककलावंत, दिव्यांग ,निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष संदीपकुमार बोरकर यांचे मार्गदर्शनात
सर्वच क्षेत्रातील लोककलावंतांना अन्नसुरक्षा योजनेमधून लाभ मिळण्यासाठी, तसेच रेशन कार्ड मधील इस्टांक त्वरित सुरू करण्यात यावा मेहकर तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल सर्व क्षेत्रातील कलावंतांना मग तो एकटा कलाकार असेल किंवा समूह कलावंत असेल अशा कलावंतामुळे राज्यातील नव्हे तर देशातील समाजामध्ये समाज जागृती ही चांगल्या प्रकारे होऊ शकते इतर माध्यमांपेक्षाही कलावंतांच्या समाज जागृती ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. इतर माध्यमातून कलावंतांच्या समाज जागृतीच्या माध्यमातून जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो कारण ते प्रत्यक्ष भूमिकेत समाज जागृती करीत असतात त्यामुळे जनतेला मनप्रसन्न येथून आनंद मिळतो म्हणून त्या माध्यमातून समाजकार्याचे प्रबोधनाचे काम हे अगदी उत्कृष्ट दर्जाचे केल्या जाते आणि म्हणून असे या राज्यामध्ये बहुतांश कलाकार आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत ते एकटे एकटे राहून समाज जागृती चे काम करतात अशा कलाकारांची उपजीविकेची अवस्था फार बिकट आहे हे मी स्वतः दृष्टीने बघितलेले आहे व आपण सर्व हे बघत आहोत.तर या कलाकाराकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे.
त्या अनुषंगाने मेहकर तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील कलावंतांना शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेमधून रेशन कार्डधारक कलावंतांना अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा. तसेच बऱ्याच महिन्यांपासून तहसील कोर्ट मेहकर या ठिकाणी पुरवठा विभागामधून रेशन कार्ड इष्टांक प्रणाली ही बंद आहे.तरी ती त्वरित सुरू करण्यात यावी. तरी निवेदन सादर करण्यासाठी सतीश भाऊ अर्जुन बोरकर, गजानन मेटांगळे, रमेश महाराज गुऱ्हाळकर, सुरेश राठोड, सुभाष ढोके ,प्रकाश ढोके, त्रंबक दाभाडे, नंदूभाऊ वाटसर, सत्यभामा गुराळकर, लक्ष्मीबाई एखंडे, सुभिद्रा गुराळकर, वंदना राठोड, विमल ढोके, कमल दाभाडे ,वसुदेव देवकर याप्रमाणे विद्यमान तहसीलदार साहेब, मेहकर यांना निवेदन देण्यासाठी हजर होते.