ताज्या घडामोडी

रणपिसे नगरमध्ये कुदळीने हत्या; डोक्यात घातलेल्या वाराने ठारफरार आरोपीस पोलिसांनी ऐका तासातच केली अटकअकोल्यातील रणपिसे नगरमध्ये माजी उपअभियंता संजय यश कौशल यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. महेंद्र विस्वासराव पवार या सराईत गुन्हेगाराने लोखंडी टिकासने हल्ला करत कौशल यांना जागीच ठार केलं. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. मारेकरी फरार असून पोलीस शोधात आहेत. पोलिसांची तपासाची दिशा सीसीटीव्ही फुटेजवर केंद्रित आहे.`

AB7

रणपिसे नगरमध्ये कुदळीने हत्या; डोक्यात घातलेल्या वाराने ठारफरार आरोपीस पोलिसांनी ऐका तासातच केली अटकअकोल्यातील रणपिसे नगरमध्ये माजी उपअभियंता संजय यश कौशल यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. महेंद्र विस्वासराव पवार या सराईत गुन्हेगाराने लोखंडी टिकासने हल्ला करत कौशल यांना जागीच ठार केलं. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. मारेकरी फरार असून पोलीस शोधात आहेत. पोलिसांची तपासाची दिशा सीसीटीव्ही फुटेजवर केंद्रित आहे.

अकोला : शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार २ जून रोजी रात्री कुदळीने डोक्यात प्रहार करून एका व्यक्तीची निघृण हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव संजय यश कौशल असून आरोपी महेंद्र पवार फरार आहे. पोलीस तपास युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अकोला शहरातील गजबजलेल्या आणि वस्तीवाढीच्या टप्प्यावर असलेल्या रणपिसे नगर जागृती शाळेजवळील परिसरात सोमवार 2 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेली ही थरारक हत्या संपूर्ण परिसराला हादरवून गेली. संजय कौशल (फ्लॅट नं. ३०२) हे मुरलीधर टॉवरमध्ये राहत होते, तर आरोपी महेंद्र पवार (फ्लॅट नं. ३०६) हा देखील याच इमारतीत राहतो. दोघांमध्ये आधीपासूनच किरकोळ वाद होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. रात्री ८ वाजता पुन्हा एकदा वाद उफाळून आला. आधीच्या भांडणात हाणामारी झाली आणि अचानक महेंद्र पवारने ताब्यातील कुदळीने संजय कौशल यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात संजय कौशल खाली कोसळले. स्थानिकांनी तत्काळ त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या खून प्रकरणानंतर आरोपी महेंद्र पवार घटनास्थळावरून फरार झाला होता, त्याचा शोध घेण्यासाठी सिव्हिल लाईन पोलीस सक्रिय झाले. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आणि गुन्हे शाखा तपासासाठी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत अखेर आरोपी महेंद्र पवार यास अटक केली असून फॉरेन्सिक तपासाद्वारे हत्येच्या आधी आणि नंतरच्या घटनाक्रमाचा तपास करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, वादाचे नेमके कारण वैयक्तिक व शेजारी संबंधांतील वाद असल्याचे सांगितले जात आहे. . घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. शहराच्या मध्यवर्ती व गजबजलेल्या परिसरात अशा प्रकारची हत्या घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मुरलीधर टॉवर सारख्या निवासी संकुलात देखील सुरक्षा यंत्रणेचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष समोर येत आहे. पोलीस खात्याने लवकरात लवकर आरोपीला अटक करावी आणि परिसरात सतर्कता वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. .

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.