१५ रुपयांवरून ५० रुपये दैनंदिन बाजार शुल्क!उत्पन्नवाढीसाठी महापालिकेचा प्रयत्न : वसुलीसाठी निविदा
AB7
१५ रुपयांवरून ५० रुपये दैनंदिन बाजार शुल्क!उत्पन्नवाढीसाठी महापालिकेचा प्रयत्न : वसुलीसाठी निविदा बोलाविणा
अकोला: महापालिका प्रशासनानेदैनंदिन बाजार वसुली शुल्क वाढवण्याचा विचार सुरू केला असून, उत्पन्नवाढीसाठी महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. शहरातील फेरीवाले, लघु व्यावसायिक, मनपाच्या जागेवर हातगाडी, स्टॉल टाकून व्यवसाय करणाऱ्यांकडून १५ ते २० बाजार शुल्क घेतल्या जात होते. ते आता ५० रुपये करण्याचा महापालिकेचा विचार दिसत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन बाजार वसुलीचा कंत्राट देणार असून, लवकरच निविदा प्रसिद्ध करणार आहे.महापालिकेला यातून उत्पन्नात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. अनेक वर्षापासून शुल्कात वाढ करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या गंगाजळीत फारसी वाढ दिसत नव्हती. दैनंदिन बाजार शुल्क वाढविल्यावर महापालिकेला तब्बल २ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. बाजार वसुलीचे काम सध्या ९ कर्मचारी करत असल्याने त्यातही वाढ करण्याची मागणी होत आहे.शुल्क वाढ कशी असेल ?खाली बसून व्यवसाय करणारे १ व्यावसायिक – १५ ऐवजी २० रुपये प्रति दिवसचारचाकी गाडीतून व्यवसाय 3 करणारे व्यावसायिक – २० रुपयांऐवजी ५० रुपये प्रति दिवसजागेनुसार शुल्क आकारण्व्यवसायासाठी मोठी जागा व्यापणाऱ्या व्यावसायिकांसाठी वेगळे दर लागू करण्यात येणार आहेत. ८x८ चौरस फू जागेसाठी – ३० रुपये तर अधिक जाग व्यापणाऱ्या व्यवसायांसाठी ३०, ६० आणि ९० रुपये असे टप्प्याटप्याने शुल्क लागू करण्यात येणार आहे. महापालिकेला दैनंदिन बाजार शुल्कातून सध्या सुमारे १ कोटी रुपये महसूल प्राप्त होतो. शुल्क दुप्पट केल्याने महसूल वाढून २ कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.