बैठकीमधील वादाची ठिणगी सभागृह बाहेर दिसून आली. ऐनवेळी नगरपरिषदमध्ये समर्थकांसह दाखल झालेल्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेचे पदाधिकारी अलोक चौधरी यांना मारहाण केली.
AB7
साईबाबा तीर्थक्षेत्र विकासआराखड्यातील भूमी अधिग्रहण संदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीमध्ये येथील नगरपरिषद सभागृहामध्ये बैठक पार पडली. मात्र, बैठकीमधील वादाची ठिणगी सभागृह बाहेर दिसून आली. ऐनवेळी नगरपरिषदमध्ये समर्थकांसह दाखल झालेल्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेचे पदाधिकारी अलोक चौधरी यांना मारहाण केली. घटनेनंतर पळापळ होऊन काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात दुर्राणी यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेपा थरी येथे मागील काही महिन्यापासून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा राजकीय संघर्ष पेटलेला गेला आहे. विधानसभा निवडणुकी नंतर हा संघर्ष अधिक वाढला आहे. आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या संघर्षामधून बुधवारी दुपारी पाथरी नगरपरिषद आवारात राडा झाला. नगरपरिषद सभागृहात आज, बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली १४४ भूमी अधिग्रहणसाठी लाभार्थी यांची बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकी दरम्यान बाबाजानी दुर्राणी गटातून नुकतेच शिवसेना शिंदे गटात दाखल झालेले माजी नगरसेवक अलोक चौधरी यांनी भूमी अधिग्रहण होत असलेल्या जागा मालकास नवीन आठवडी बाजार येथे प्रस्तावित शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी संदर्भात निर्णय घेण्यात यावा आणि घरकुल लाभार्थी निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.