महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची(तिथीनुसार)जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न
AB7
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची(तिथीनुसार)जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न.
दिं.१७ मार्च २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात छ.शिवाजीनगर येथील भाजीबाजारात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाअध्यक्ष सौ.प्रशंसा मनोज अंबेरे यांचा वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.दरवर्षी प्रमाणे यंदाही जुने शहरातील जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती मित्र मंडळाची भव्य मिरवणूकीचा समारोपीय कार्यक्रम घेऊन सर्व बाभळेश्वर मित्र मंडळाला सहकार्य करणाऱ्या सर्व नामवंत हस्त्यांचा शाल व सन्मानपत्र देऊन मनसे महिला जिल्हाध्यक्ष सौ.प्रशंसा अंबेरे यांचा हस्ते धुमधडाक्यात सत्कार करण्यात आला.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजेशभाऊ काळे, राहुल माळी,रुपाली गमे शहर उपाध्यक्ष, संगिता चोपडे शाखाध्यक्ष,सारिका नरडे शाखाउपाध्यक्ष ,अनिता डिगेकर,माया तायडे, ममता कोकाटे,रजनी अंबेरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.