लोककलेला राजाश्रय द्या; अटी शर्ती न ठेवता सर्व कलावंतांना मानधन मिळावे – राष्ट्रीय लोक कलावंत समितीची मागणी.
AB7
लोककलेला राजाश्रय द्या; अटी शर्ती न ठेवता सर्व कलावंतांना मानधन मिळावे – राष्ट्रीय लोक कलावंत समितीची मागणी.
मेहकर : १० मार्च रोजीराष्ट्रीय लोककलावंत, दिव्यांग, निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे वतीने ग्रामीण भागातील शोषित, पीडित उपेक्षित लोककलाकार कवी, गायक, साहित्यिक, वादक अभिनेते नाटककार निर्माता दिग्दर्शक कॅमेरा मॅन, तमाशा कलावंत वाघे मुरळी, बहुरूपी शास्त्रीय सुगम संगीत, संगीत विशारद ऑर्केस्ट्रा कलाकार , लावणी, डान्सर, कथक नृत्यांगना, ह.भ.प. कीर्तनकार, वारकरी सर्व प्रकारचे भजनी मंडळी, कलावंत गायक मंडळ ब्रास बँड वादक, बँजो पार्टी कलावंत, संबळ,
सनई, वादक वासुदेव पांगुळ, नंदीबैलवाले भारुड शाहिरी पोवाडे कलाकार, तृतीय पंथी
डांसर इत्यादी लोककलावंत असून सदर लोक कलावंत हे सामाजिक समता व बांधिलकी जपणारी असून
सदर कलावंतांना शासनाकडून वृद्ध मानधन मिळत असते. परंतु सदर मानधन मिळत असणाऱ्या
काही जाचक अटीमुळे यातील काही कलाकारांना या वयोवृद्ध मानधनाचा लाभ घेता येत नाही तसेच लोककलावंतांना उपासमारीची वेळ येत आहे ह्या डिजिटल जमान्यांमध्ये लोक कलावंताची कला ही लोप पावत चाललो आहे. तरी वृद्ध कलावंत मानधन घेण्यासाठी काही खूप जाचक अटी मुळे लोककलावंतांना वृद्ध कलावंत मानधनासाठी अर्ज करीत असताना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय लोक कलावंत, दिव्यांग, निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप बोरकर, उपाध्यक्ष दुर्गादास श्रीराम काटे (गोंधळी महाराज), सचिव सतीश अर्जुन
बोरकर, समितीचे मार्गदर्शक ह. भप ज्ञानेश्वर तायडे महाराज शाहीर जगदीश बोरकर, विधी सल्लागार एडवोकेट राजेश दाभाडे, एडवोकेट माधव घोडे, एडवोकेट ओम भालेराव, त्याचप्रमाणे सुनील तुकाराम पवार, शिवाजी काटे, मंगेश वानखेडे यांनी निवेदन दिले. असून महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या या लोककलावंतांना महाराष्ट्र शासनाने राज्यश्रय द्यावा, सर्व कलावंतांना कलावंत मानधन या योजनेमध्ये सामावून घ्यावे. जाचक अटी रद्द कराव्या. अशा विविध मागणीसाठी राष्ट्रीय लोक कलावंत संघर्ष समितीने गटविकास अधिकारी, तहसीलदार मेहकर यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.