जुने शहरात शिवजयंतीसाठी साकारला प्रतापगड!जय बाभळेश्वर शिवजयंती उत्सव समितीचे आयोजन
AB7
जुने शहरात शिवजयंतीसाठी साकारला प्रतापगड!जय बाभळेश्वर शिवजयंती उत्सव समितीचे आयोजन
अकोला: जुने शहरातील रेणुकानगरमध्ये येत्या १७ मार्च रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त परिसरात प्रतापगड किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. दि. १८ ते १८ मार्च अशा तीन दिवसीय उत्सवात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जुने शहरातील डाबकी रोड परिसरात मागील ३० वर्षांपासून जय बाभळांवर सार्वजनिक शिवजयंती अलरव समितीकडून शिवजयंती उत्सव मोठ्चा उत्साहात साजरा केला जातो. यंदाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे ३१ वे वर्ष असून, १७ मार्च रोजी जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी ५ ते ६ या वेळेत शिवरायांचे मूर्तीपूजन केले जाईल ८:३० वाजता मिरवणुकीला प्रारंभ होऊन डाबकी रोड मार्गे राजकमल हॉटेल ते कस्तुरबा गांधी रुग्णालयामागील छत्रपती शिवा महाराज नगरस्थित शिवरायांच्या प्रतिमेसमोर रात्री १० वाजता मिरवणुकीची सांगता होणार आहे. मिरवणुकीपूर्वी विविध क्षेत्रांत सामाजिक दायित्व निभावणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, माजी नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती व सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांची उपस्थिती राहणार आहे. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.१६ मार्च रोजी मशाल यात्राशिवरायांच्या जयंतीनिमित्त १६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता लहान मुली, तरुणी व महिलांच्या उपस्थितीत मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी नगरस्थित वाल्मिकी चौकातील तुळजाभवानी माता मंदिरातून मशाल यात्रेला प्रारंभ होईल. डाबकी रोड येथून पायी निघालेल्या मशाल यात्रेचा समारोप रेणुका नगर येथे उभारलेल्या प्रतापगड किल्ल्यावर होईल. पाठिकाणी सामूहिक शिवप्रार्थनेचे वाचन व शिवरायांची आरती केली जाईल.