ताज्या घडामोडी

जनसंघते ते भाजपा काम करणारे स्वर्गीय बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र अकोट पंचायत समिती उपसभापती कुणबी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते संतोष शिवरकर यांच्याकडे अकोला जिल्हा ग्रामीण भाजपची धुरा सोपवण्यात आली

AB7

 

 

 

 

अकोला  जनसंघते ते भाजपा काम करणारे स्वर्गीय बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र अकोट पंचायत समिती उपसभापती कुणबी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते संतोष शिवरकर यांच्याकडे अकोला जिल्हा ग्रामीण भाजपची धुरा सोपवण्यात आलीआहे. भारतीय जनता पक्ष लोकशाही पक्षाला मानणारा पक्ष असून कार्यकर्त्यांची मते जाणून पक्षाने एकमताने भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे, कार्य कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांची निवड जाहीर केली.

केळीवेळी येथील शेतकरी तसेच कुणबी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनेची निकट संबंध असलेले भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये विविध पदावर कार्यरत असणारे व सध्या युवा मोर्चाचा कारभार त्यांनी समर्थपणे सांभाळला पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन युवा नेतृत्व तिसरी पिढी संघटनेने सुरू करून चौथ्या लाईनची सुद्धा नेतृत्व निर्माण करण्याची तयारी भाजपाने करून पन्नास वर्षांचा आराखडा तयार केला आहे त्या अनुषंगाने 40 वर्षातील आतील भारतीय जनता जनता पक्षाचा धुरा त्यांच्याकडे सोपविला आहे ग्रामीण भागामध्ये व आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वात संघटनात्मक बळ मिळवण्याच्या दृष्टीने जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे पालकमंत्री नामदार एडवोकेट आकाश भाऊसाहेब फुंडकर, संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोटेकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील विजय अग्रवाल तेजराव थोरात, यांना दिले आहे

विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य आर्थिक सामाजिक संघटनेने त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.