> *अवकाळी पावसाचा इशारा*
अकोला, दि. 26 : भारतीय हवामान विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे प्राप्त संदेशानुसार, जिल्ह्यात दि. 27 व 28 डिसेंबर रोजी वादळ, अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतक-यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. बाजार समितीतही शेतमाल विक्रीला आणला असल्यास काळजी घ्यावी. वीज व गारांपासून वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजा चमकताना झाडाखाली थांबू नये. मोबाईल बंद ठेवावा, आदी सूचना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत.