श्रीमंत महिलांना प्रोटीन शेकमध्ये नशेच्या गोळ्या देऊन ब्लॅकमेल करत होता जिम ट्रेनर, 11 महिलांच्या संपर्कात
एकता गुप्ता ही रोज ग्रीन पार्कमध्ये असलेल्या जिममध्ये जात होती. नेहमीप्रमाणे 24 जून रोजी सकाळी ती जिममध्ये गेली. त्यानंतर परत आलीच नाही. तिचा तपास लागला नाही. यामुळे तिच्या कुटुंबियांनी पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दाद मागितली.
एका विवाहीत महिलेच्या हत्या प्रकरणात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कानपूरमधील एकता गुप्ता हत्या प्रकरणाचे राज चार महिन्यांनी समोर आले आहे. या प्रकरणात जिम ट्रेनर विमल सोनी याचे व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉल डिटेल्स समोर आले आहे. त्यानुसार, प्रशिक्षणादरम्यान तो श्रीमंत महिलांच्या जवळ जात होता. त्यामुळे अनेक महिलांनी विमलच्या आर्थिक गरजाही पूर्ण केल्या. प्रोटीन शेकमध्ये नशेच्या गोळ्या टाकून तो महिलांना ब्लॅकमेल करत होता. 11 महिला त्याच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे.
एकता प्रकरणात जिम ट्रेनर विमल सोनी आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचे मोबाईल फोनचे कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर) काढले. त्याचे व्हॉट्सअॅप चॅट काढले. त्यातून तो महिलांशी अश्लील चॅटींग करत असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासात तो एनर्जी ड्रिंकमध्ये नशेच्या गोळ्या देत होता. तो महिलांना ‘सप्लिमेंट’ म्हणजे जिममध्ये एनर्जी ड्रिंकमध्ये नशेच्या गोळ्या टाकून देत होता. त्यानंतर काही महिलांना नशेची सवय लागली. त्या त्याच्या संपर्कात आल्या.
सिव्हिल लाइन्सच्या गोपाल विहारमध्ये राहणारी एकता गुप्ता ही रोज ग्रीन पार्कमध्ये असलेल्या जिममध्ये जात होती. नेहमीप्रमाणे 24 जून रोजी सकाळी ती जिममध्ये गेली. त्यानंतर परत आलीच नाही. तिचा तपास लागला नाही. यामुळे तिच्या कुटुंबियांनी पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दाद मागितली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. तब्बल चार महिन्यांनंतर शनिवारी 26 ऑक्टोबर रोजी विमल सोनी याला अटक करण्यात आली. त्यानंतर या हत्येचे गुपित उघड झाले.