ताज्या घडामोडी

जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे पोर्टल सुरू*

सतीश पवार

 

 

*जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे पोर्टल सुरू*

 

अकोला, दि. 30 : जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पोर्टलचा वापर करून ॲडमिशन कार्ड डाऊनलोड करता येतील. तसे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातून या परीक्षेसाठी 6 हजार 967 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. ही परीक्षा एकूण 25 केंद्रांवर होईल.

पोर्टलचा पत्ता https://cbseitms.rcil.gov.in/nvs/admincard असा असून, विद्यार्थ्यांना अर्ज करताना मिळालेला रजिस्ट्रेशन क्रमांक हा आयडी म्हणून व जन्मतारीख पासवर्ड म्हणून वापरून परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. परीक्षार्थ्यांनी दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 10. 15 वा. परीक्षा केंद्रावर पोहोचावे. सोबत प्रवेशपत्र, निळा किंवा काळा बॉलपेन, आधारपत्र किंवा शासनमान्य निवासी दाखल्याची छायांकित प्रत आदी कागदपत्रे सोबत असावीत. अधिक माहितीसाठी विद्यालयाशी (0724) 2991087 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.