ताज्या घडामोडी

शासकीय यंत्रणेच्या तांत्रिक चुकांसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नका

Akola B7

अकोला

शासकीय यंत्रणेच्या तांत्रिक चुकांसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नका , वसुलीसाठी मुदतवाढ द्या किंवा अन्य अनुदानातून रक्कम कपात करा, शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याची नाहक कारवाई करु नये.. चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी. आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे यांनी केली. ,सन 2022 मधे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सन २०२३ मधे शासकीय आर्थिक मदतीची रक्कम वितरित करताना यंत्रणेतील तांत्रिक दोष कारणांमुळे काही शेतकऱ्यांना दुबार अनुदान प्राप्त वितरित झाले आहे. त्यामुळे अधिकच्या रकमेची वसुली करणेबाबत शासनाकडून क्षेत्रिय अधिका-यांना सूचना प्राप्त आहेत, त्यानुसार तहसीलदार तेल्हारा यांनी वसुलीसाठी नोटीस संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत, त्यातील काही शेतकऱ्यांनी रकमेचा भरणा देखील केलेला आहे , परंतु यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन आणि इतर पिकांची हानी झाल्याने शेतकरी आर्थिक द्रुष्टीने कमकुवत असल्याने शेतकऱ्यांना रक्कम भरणे शक्य नसल्याने वसुलीच्या कार्यवाहीसाठी अशा शेतकऱ्यांनी मुदत वाढ मागीतली आहे, त्यांना मुदतवाढ देण्यात यावी . तसेच अनुदानामध्ये रक्कम कपात करण्यात यावी त्यांच्याकडून कोणतेही प्रकारची शक्तीची वसुली करू नये असे निवेदन मुख्यमंत्री कृषिमंत्री यांच्याकडे खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहावे व शेतकऱ्याला सहकार्याची भूमिका घेत असताना अशा पद्धतीने कारवाई करू नये शासनाच्या चुकीचा ,भुदंड शेतकरी राजाला होता कामा नये यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.