महामंडळाच्या बसला लागली आग आगीत बस संपूर्ण जळून खाक
अकोला जिल्ह्यातील आकोट ते पोपटखेड मार्गावर आज महामंडळाची बसला आग लागल्याने प्रवाशांचा थरारा पाहायला मिळाला सुदैवाने या घटनेत बसमधील प्रवासी सुरक्षित आहेत ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे बसला आग लागल्याची माहिती मिळतात अकोट नगर परिषद अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती मात्र या घटनेत महामंडळाची बस संपूर्ण जळून खाक झाली आहे त्यामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे बस मध्ये अत्यंत कमी प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे दरम्यान बस चालकाच्या सतर्कने मोठा अनर्थ टळला