रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना त्रास होता कामा नये . मा साजिद खान यांनी घेतली मनपा अधिकाऱ्यांची बैठक
अकोला : येत्या २ मार्च पासून पवित्र रमजान महिना सुरू होत असून त्यापूर्वी ईदगाह परिसराची स्वच्छता, रंग रंगोटी, डागडुजी, पथदिवे, स्वच्छ पाणी, नियमित पाणी पुरवठा, मुस्लिम बहुल परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे तसेच जोडरस्त्याची दुरुस्ती करणे यांसह विविध सूचना गुरुवारी आ. साजिद खान यांनी मनपा अधिकारी वर्गाच्या घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी माजी नगरसेवक मोहम्मद इरफान, पराग कांबळे उपस्थित होते.
शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्या सुद्धा मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहे परिणामी मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. येत्या २ मार्च पासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे त्यापूर्वी शहरातील सर्व ईदगाह परिसराची स्वच्छता करीत रंगरंगोटी व अन्य मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात याव्या. शहरातील मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये साफसफाई, डास प्रतिबंधक औषधांची फवारणी, बंद असलेले पथदिवे बसविण्यात यावे, नियमित पणे स्वच्छ पाणी पुरवठा, ज्या भागात झाडे झुडपे वाढली आहेत त्याची छाटणी करणे, अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्या असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे, परिणामी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नाल्या सफाई करणे, डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करणे असे निर्देश आ. साजिद खान यांनी मनपा अधिकारी वर्गाच्या घेतलेल्या आढावा बैठकीत दिले. यावेळी शहरात ज्या ठिकाणी पथदिवे बंद आहेत अशी पथदिवे काढून नवीन पथदिवे लावण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश सुद्धा यावेळी आ. पठाण यांनी दिले. इदगाह ला जोडरस्ता म्हणून जाणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करीत रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्याचे आदेशित केले. या आढावा बैठकीला झोन अधिकारी विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, दिलीप जाधव, अमोल डोईफोडे, गजानन घोंगे, आरोग्य व स्वच्छता अधिकारी संजय खोसे, अतिक्रमण विभाग अधिकारी चंदू इंगळे, मिश्रा आदी उपस्थित होते.