मुस्लीम वस्त्यांमधील समस्या सोडवा-, कशिश खान
अकोला : रमजानचा पवित्र महिना सुरू होण्यापूर्वी अकोला शहरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये साफसफाई, डास प्रतिबंधक औषधाची फवारणी, तसेच पथदिवे बसविण्याची मागणी अकोला शहर महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष कशीश खानी यांनी मनपा आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.शहरातील मुस्लीम वस्त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. या सर्व समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे साफसफाई करण्यात यावी. या भागांमध्ये काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यांची छाटणी करणेही गरजेचे आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी या भागांमध्ये डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी, तसेच या भागांमधील पथदिवे गत अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे सर्वत्रअंधार असतो. ही समस्या दूर करण्यासाठी नवीन पथदिवे बसविण्यात यावेत, तसेच या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात यावी. ईदगाहची स्वच्छता करण्यात यावी, अशा विविध मागण्या कशीश खान यांनी निवेदनात केल्या आहेत.