लोककलावंतांच्या, दिव्यांगांच्या, आणि निराधारांच्या न्याय हक्कासाठी आढावा बैठक संपन्न झाली
AB7
मेहकर स्थानिक आज दिनांक 27/4/2025 रोजी विश्रामगृह मेहकर या ठिकाणी राष्ट्रीय लोककलावंत, दिव्यांग, निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे वतीने लोककलावंतांच्या, दिव्यांगांच्या, आणि निराधारांच्या न्याय हक्कासाठी आढावा बैठक संपन्न झाली असून, सदर बैठकीमध्ये ग्रामीण भागातील शोषित पिढीत उपेक्षित लोककलाकार कवी ,गायक ,साहित्यिक ,वादक, अभिनेते ,नाटककार ,निर्माता, दिग्दर्शक , तमाशा कलावंत, वाघे मुरळी, बहुरूपी, शास्त्रीय सुगम संगीत ,संगीत विशारद, ऑर्केस्ट्रा कलाकार, लावणी डान्सर, कथक नृत्यांगना ,ह .भ. प. कीर्तनकार ,वारकरी, सर्व प्रकारचे भजनी मंडळी कलावंत, गायक मंडळ, ब्रास बँड वादक, बँजो पार्टी कलावंत, संबळ सनई वादक ,वासुदेव पांगुळ ,नंदीबैलवाले, भारुड कलाकार, शाहिरी पोवाडे कलाकार, तृतीयपंथी कलाकार ,तसेच सर्व प्रकारच्या कलावंताच्या न्याय हक्कासाठी आढावा बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीमध्ये लोककलावंतांच्या वृद्ध कलावंत मानधन घेण्यासाठी शासनाच्या जाचक अटी असून सदर ह्या या अटीमुळे राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन हे काहीच कलावंतांना मिळते आणि काही कलावंतांना मिळत नाही यासंदर्भात सदर बैठकीमध्ये चर्चा झाली. तरी चर्चेनंतर सदर बैठकीमध्ये संघर्ष समितीच्या काही मागण्यांची चर्चा करण्यात आली. त्या मागण्या म्हणजे
1) वृद्ध कलावंतांचे वय 40 वर्षे असावे
2) शासकीय प्रमाणपत्र आवश्यक असणे ही रद्द करण्यात यावी
3) कलाकाराने कोणत्याही ठिकाणी कला सादर करून लोककलेचा वारसा जपणारे कला गावात किंवा एखाद्या संस्था ठिकाणी सादर केली असेल त्या संस्थाचे व गाव पातळीवरचे प्रमाणपत्र वृद्ध कलावंत मानधनासाठी लागू करावे तसेच कलावंतांनी शालेय प्रोग्राम सादर केला असेल ते शालेय प्रमाणपत्र सुद्धा मानधनासाठी लागू करावे
4) कलावंतांना शासनामार्फत एसटी फ्री पास लागू करण्यात यावी
5)वृद्ध कलावंतांचे मानधन साठी निवड करत असताना कलावंतांच्या कागदपत्रावर विसंबून न राहता प्रत्येक कलावंतांची चाचणी घेण्यात यावी तरीही प्रत्येक पंचायत समितीमध्ये चाचणी घेण्यात यावी
6)कलावंतांचे मानधनांमध्ये सरसकट दरमहा पंधरा हजार रुपये वाढ देण्यात यावी
7)जिल्हा कार्यकारणी घटित करून प्रत्येक तालुका ठिकाणी तालुकाध्यक्ष देण्यात यावे (पूर्वीप्रमाणे )
8)दिव्यांग कलावंतांना प्रथम प्राधान्य द्यावे
9)कलावंतांना ओळखपत्र देण्यात यावे
10)कलावंतांचा आपत्कालीन मृत्यू झाल्यास त्याला तात्काळ शासनाने दोन लाख रुपयाची मदत करावी
तरी वरील प्रमाणे लोक कलावंतांच्या अटी या मान्य करण्यात याव्या ही चर्चा सदर आढावा बैठकीमध्ये करण्यात आली. त्याचप्रमाणे दिव्यांग व निराधार यांच्याही भरपूर काही समस्या मांडण्यात आल्या. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी दुर्गादास श्रीराम काटे हे होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी काटे यांनी केले तसेच भागवत दादा भिसे यांनी सदर बैठकीमध्ये गाव तेथे शाखा संघर्ष समितीची स्थापना झाली पाहिजे . ह्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितले. तसेच सदर बैठकीमध्ये उपस्थित भागवत महाराज वाघ हिवरा साबळे, सुनील पवार मेहकर, विष्णू सूर्यवंशी अमडापूर, नंदकिशोर अटक जानेफळ, गजानन बळी देऊळगाव माळी, भागवत पुंड अंजनी बुद्रुक, रमेश वानखेडे अंजनी बुद्रुक, पांडुरंग सपकाळ गणपुर, विकास बोरकर लोणी गवळी, संतोष दाभाडे उटी, वसंतदादा अवसरमोल लोणी काळे,मंगेश वानखेडे गवंढाळा, कारभारी पाखरे दुधा, संदीप सरदार कळपविहीर, समाधान सरदार कळपविहीर, सतीश इंगळे कळपविहीर, विलास मुळे पांगरी उंबर हांडे, असंख्य कलाकार या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सदर बैठकीचे आयोजन हे संघर्ष समितीचे अध्यक्ष संदीपकुमार बोरकर यांनी केले होते. तसेच सदर बैठकीमध्ये आभार संघर्ष समितीचे सचिव सतीश बोरकर यांनी केले. तरी सदर बैठकीमध्ये सर्वच कलाकारांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. आणि त्यांनी सांगितले की सदर या काळामध्ये लोका कलावंतांना शासनाने वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. याप्रकारे सदर बैठकीचे आयोजन झालेली असून येणाऱ्या काळामध्ये उभ्या महाराष्ट्रातील लोककलावंत त्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी उभ्या महाराष्ट्रावर संघर्ष करत राहू असे सांगितले.