ताज्या घडामोडी

शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी खंबीरपणे उभा राहील : खासदार अनुप धोत्रे

AB7

 

शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी खंबीरपणे उभा राहील : खासदार अनुप धोत्रे

 

अकोला : शिक्षकांचे प्रश्नसोडविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. तसेच त्यासाठी खंबीरपणे उभा राहिल अशी ग्वाही खासदार अनुप धोत्रे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षकांचा मेळावा तसेच शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणारे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार धोत्रे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार किरणराव सरनाईक, तर प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहम्मद मोहम्मद बुद्रुजम्मा, सुनील जानोरकर, अतुल भालतिलक, रितेश मिर्झापुरे, प्रकाश डवले, संजय देशमुख,दिनेश काटे, मो. कमरुद्दीन, ज्ञानेश्वर चव्हाण, दिपक कुळकर्णी, जमीर पटेल तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खासदार अनुप धोत्रे यांनी शिक्षकांचे राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय प्रश्न सोडवण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेण्याचा शब्द दिला. आमदार किरणराव सरनाईक यांनी संघटनेने प्रेरणादायी शिक्षण रत्न पुरस्काराचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. प्रास्ताविकात मनीष गावंडे यांनी संघटनेचा प्रवास व शिक्षकांच्या प्रमुख मागण्या मान्यवरांसमोर मांडल्या. जिल्ह्यातील प्रेरणादायी संस्थाचालक, मुख्याध्यापक,शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांचा खासदार धोत्रे व आ. सरनाईक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्केश खंडकर मोहम्मद जावेदजमा, प्रमोद गाठे, अविनाश मते, कैलास सुरडकर, गजानन सवडतकर, नितीन दिवनाले, संतोष गावंडे, दत्ता अमानकर, सचिन अरबाड, सुदर्शन भिसे, अजीमुद्दीन राही, वसीम मुजाहिद, अमित शिरसाट, मोहम्मद वसिम, अमोल पटोकार, अमोल वानखडे, मिलिंद कराडे, मोहम्मद खालिद, सचिन तायडे, दत्ता घोंगे, मोहम्मद वसीम आदींनी परिश्रम घेतले.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.