ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांच्या वाहनातून उमेदवारांना पैसे पोहोचवले जातात, शरद पवार यांचा खळबळजनक आरोप

शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. त्यांनी पोलिसांच्या वाहनातून उमेदवारांना पैसे पोहोचवले जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. वाचा सविस्तर...

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. अशात शरद पवार यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. अनेक गोष्टी हल्ली होतात. हे सरकारचं वैशिष्ट्ये आहेच. विमानने फॉर्म पोहोचवला. अनेक जिल्ह्यातून ऐकतोय, अधिकाऱ्यांकडून ऐकतोय, सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना अर्थ सहाय्य दिलं जातं त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात. पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते. त्या विभागातील अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळतं, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.त्यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते. त्यावर मला अधिक बोलायची इच्छा होती. पण त्या अधिकाऱ्यांनी कमिटमेंट करून घेतली आमची नाव पुढे आणू नका. त्यामुळे त्यांचं भवितव्य संकटात जावू नये म्हणून मी अधिक बोलत नाही. पण ही नावे ऐकायला मिळतंय की पोलीस दलाची वाहनं आहेत त्यातून उमेदवारांना रसद पोहोचवली जात आहे. माझ्या हातात ऑथेटिंक माहिती असती तर मी वाटेल ते केलं असतं. पण माहितीशिवाय भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही, असंही शरद पवार म्हणालेत.

फोन टॅपिंग प्रकरण आणि रश्मी शुक्ला यांच्याबाबतह शरद पवार यांनी विधान केलं आहे. माझी स्वत: ची जी करिअरची सुरुवात आहे ती गृहखात्याचा राज्यमंत्री म्हणून झाली. त्यानंतर गृहमंत्री होतो. चारवेळा मुख्यमंत्री असताना गृहखातं माझ्याकडे आहे. मला गृहखात्याची चांगली माहिती आहे. चांगले कर्तबगार अधिकारी गृहखात्यात होते. राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकाबाबत जाहीरपणाने लोक आणि राजकीय पक्ष मागण्या करत आहेत. ही स्थिती कधीच आली नव्हती. त्या व्यक्तीबाबत बोललं जातं. त्यांनी काय काय उद्योग केले, फोन टॅपिंग झाली त्याची चर्चा झाली. खरंतर चौकशी करून त्यातील सत्य काढण्याची सरकारची जबाबदारी होती. पण सरकारने जबाबदारी पाळली नाही. उलट त्यांना एक्स्टेन्शन दिलं. याचा अर्थ या यंत्रणा कशा वागतात एक वेगळी नीती राज्य सरकारने ठरवलेली दिसती. त्याचा हा परिणाम आहे, असं शरद पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारला वाटत असेल तर काळजी घेतली पाहिजे. पण जो गृहमंत्री आहे. त्यांना सुरक्षा आहे. आणि तरीही सुरक्षा दिली जाते याचा अर्थ तो विषय गंभीर आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. त्यांना जी सुरक्षा देण्यात आली. तीच मला देण्यात येणार होती. पण मी नकार दिला, असं शरद पवार म्हणालेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.