ताज्या घडामोडी

तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे सोमवती अमावस्या निमित्य भाविकांचा जनसागर .श्री लक्षेक्ष्वर संस्थानने पुरवल्या विविध सुविधा .*

सतिश पवार

> *तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे सोमवती अमावस्या निमित्य भाविकांचा जनसागर .श्री लक्षेक्ष्वर संस्थानने पुरवल्या विविध सुविधा .*

 

अकोला : मुर्तीजापुर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी तीरावरील पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे पूर्णा नदी घाटावर आज सोमवती अमावस्या निमित्त व पौष मासाला लागून आलेल्या या सोमवतीनिमित्त आपल्या पूर्वजांना मिळवण्याची विधी पार पाडण्याकरिता अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील हजारो भाविक आज श्री लक्षेश्वर नगरी लाखपुरी येथे सकाळपासून दुपार पर्यंत उपस्थित झाले . भाविकांच्या सोयीसाठी श्री लक्षेश्वर संस्थान तर्फे मंदिर परिसर व पूर्णा नदी घाट परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,वाहन पार्किंग , मंडप व्यवस्था , तैराकी पथक , प्रसाद व्यवस्था करण्यात आली होती . तसेच भाविकांना लागणाऱ्या वस्तूचे अनेक दुकान या यात्रे निमित्य व्यापाऱ्यांनी थाटली होती .आपल्या पूर्वजांना मिळवण्याचा विधी पार पाळण्याकरिता अनेक ब्राह्मण व न्हावी पूर्ण घाटावर उपस्थित होते . यावेळी मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त होता . सोमवती यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी श्री लक्षेश्वर संस्थांचे अनेक सेवाधरी आज कार्यरत होते. संस्थांची प्रगती व सेवाधार्‍यांची सेवा याबाबत अनेक भाविकांनी आज समाधान व्यक्त केले तसेच शासनाने नदीपर्यंत रस्ता व नदीवर घाट तयार करून भाविकांची सोय करावी असे मत आपले विचार या संस्थांच्या वहीत अधोरेखित केले. अशी माहिती श्री लक्षेक्ष्वर संस्थान तर्फे देण्यात आली .

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.