ताज्या घडामोडी

आता पुलावरून पाणी जाणार नाही, वाहतूकही थांबणार नाही

खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांना यश

  • गांधीग्राम येथे 100 कोटींच्या नव्या पुलासह सुसज्ज घाट निर्मिती लवकरच
  • Monday, December 30, 2024

 

खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांना यश

निर्माण कार्य प्रारंभ, अधिकाऱ्यांना निर्देश, नागरिकांच्या जाणून घेतल्या सूचना

 

  1. आता पुलावरून पाणी जाणार नाही, वाहतूकही थांबणार नाही

 

अकोला- गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील शंभर वर्षांपेक्षा जास्त जुना असलेला पूल कालबाह्य झाल्याने हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारल्या जाणार आहे. तसेच या पुलाजवळ सुसज्ज असा घाट सुद्धा निर्माण केला जाणार आहे. खा. अनुप धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा प्रारंभ होत असून काम दर्जेदार व्हावे व वेळेत पूर्ण व्हावे यासाठी खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांनी सोमवारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. अधिकाऱ्यांना काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच गावकऱ्यांकडून सूचना सुद्धा मागविल्या.  गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील ऐतिहासिक पूल शंभर वर्षांपेक्षा जास्त जुना झाल्याने व तो रहदारीसाठी सक्षम नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरणाकडून हा पूल वापरण्यासाठी बंद करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी या पुलावरील रहदारी बंद करण्यात आली. त्यामुळे अकोला-अकोट मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही अडचण सोडविण्यासाठी आ. रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेऊन राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून अकोला-अकोट रेल्वे फेऱ्या प्रारंभ केल्या होत्या. पूर्णा नदीच्या पात्रातून चार कोटी रुपयांचा पूल बांधला होता. तसेच गांधीग्राम जवळील गोपालखेड येथे उभारण्यात आलेल्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी ज्या काही अडचणी होत्या त्याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून व शासनाकडे पाठपुरावा करून त्या अडचणी सोडवून गोपालखेड च्या पुलावरूनही वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र भविष्यातील अडचणी लक्षात घेता भविष्यात शेतकरी व नागरिक यांना पूल किंवा रस्त्यासाठी कोणती अडचण निर्माण होऊ नये, अकोला-अकोट मार्गावरील वाहतूक कोणत्याही कारणाने विस्कळीत होऊ नये, यासाठी खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने गांधीग्रामच्या जुन्या पुलाच्या जागेवर नवीन पूल बांधण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून जुन्या पुलाच्या जागेवर नवीन पूल बांधण्याचे निर्माण कार्य प्रारंभ करण्यात येत आहे. हा नवीन पूल जुन्या पुलापेक्षा बराच उंच असेल त्यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थितीच्या वेळी अकोला-अकोट मार्गावरील वाहतूक यापुढे पुराच्या पाण्याच्या कारणाने विस्कळीत होणार नाही. याशिवाय या पुलाच्या बाजूला श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येणाऱ्या कावडधारी शिवभक्तांसाठी 8 मीटर रुंद असा पायऱ्यांचा सुसज्ज घाट निर्माण केला जाणार आहे. कावड व पालख्यांसोबतच गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन यासह विविध धार्मिक कार्यांसाठी हा घाट उपयोगात येणार आहे. या सर्व कामांचा प्रारंभ होत असल्याने खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांनी सोमवार दि. 30 डिसेंबर रोजी या ठिकाणी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. पुलाचे व घाटाचे काम दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण व्हावे यासाठी निर्देश दिले. तसेच या कामाबाबत गांधीग्राम व परिसरातील नागरिकांकडून सूचना सुद्धा मागविल्या.  यावेळी भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, मनिराम टाले, विनोद मंगळे, मंगेश घुले, बाळासाहेब धुमाळे, गिरीश कोरडे, मधु पाटकर, ज्ञानेश्वर आडे, किरण ठाकरे, दत्ता काठोळे, नंदू राठोड, सरपंच शरद ठाकरे, अतुल आवारे, पवन वर्मा यांची उपस्थिती होती .अशी माहिती भाजप च्या सूत्रांकडून देण्यात आ

ली.

 

 

 

 

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.