संत शिरोमणी सेनाजी महाराज यांचा परमार्थिक वसा नाभिक समाजाने घ्यावा ..!सकल संत विचार प्रचारक प्रमोदजी
AB7 ज्ञानेश्वर निखाडे
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांचा परमार्थिक वसा नाभिक समाजाने घ्यावा ..!सकल संत विचार प्रचारक प्रमोदजी
अकोला:-वीर भगतसिंग नगर शिवाजी चौक येथे सौ मेघाली विवेक पांडे यांचे निवासस्थानी श्री संत सेनाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला सकाळी काकडा 5 ते 6 नंतर कलश पूजन व जागृती संत सेना महाराज प्रतिमा पूजन दीप पूजन व दहा ते बारा वाजता सकल संत विचार प्रचारक प्रमोद जी महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले त्याप्रसंगी संत सेना महाराजांचे चरित्र व त्यांचा परमार्थ या विषयावर प्रकाश टाकून नाभिक समाज बांधवांना श्री संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या परमार्थाचा वसा नाभिक समाजाने घ्यावा असे कीर्तनातून प्रबोधनपर बोलले व संध्याकाळी गुरुदेव सेवा भजन मंडळ अकोला भजन संध्या व आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी समस्त नाभिक समाज बांधव महिला भाविक भक्त कीर्तनाला उपस्थित होते.