छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर एकेरी विशेष गाडी चालवीण्याचा निर्णय
AB7
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर एकेरी विशेष गाडी चालवीण्याचा निर्णय
शेगांव ग्रीष्मकालीन गदींची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणेः गाडी क्रमांक ०१०१७ विशेष दिनांक २८.०४.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी नागपूर येथे १५.३० वाजता सुटेल. थांबे : दादर, ठाणे, कल्याण, नासिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा. संरचना : एक वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry. indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.