ताज्या घडामोडी

भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न*

Ab7


*भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न*

अकोला:- एएके 24 ग्रुप तथा फलक शिक्षण अँड सोशल वेल्फेयर सोसायटी संकल्प कला क्रिडा बहुउद्देशीय शिक्षण संस्थाच्या वतीने दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी इंदिरा नगर युसुफ अली अंजान चौक,अकोट फैल, अकोला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिबिरामध्ये डॉ स्वप्निल लाहोळे,डॉ प्रणय महल्ले,डॉ संकेत वखारिया,डॉ मोहसिन खान,डॉ संदिप इंगळे,डॉ शेख मेहफुज़,डॉ अरीब खान,डॉ इकरार राजा,डॉ पुजा खेतान,डॉ.मेहविश खान, ईत्यादी डॉक्टरांनी मोफत तपासणी करून मोफत औषधी वितरण केली.मोफत आरोग्य शिबिराचा अकोट फाईल परिसरातील 850 नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फ़िल्म प्रॉड्यूसर दिलीप वानखड़े, कार्यक्रमचे उद्घाटन डॉक्टर स्वप्निल लाहोळे,प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत शुभम वानखड़े,रुग्णसेवक मंगेशी केनेकर,आरयुसीसी मेंबर दक्षिण मध्य रेलवे एजाज अहमद,सामाजिक कार्यकर्ता शकूर खान लोधी,नौशाद खान पठान, शौकत अली,नारी शक्ति सुमैया अली,सैयद नासिर, अक्षय सूर्यवंशी होते कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता समीर खान नौशाद खान व पत्रकार आसिफ खान,सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी केले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णसेवक रक्षण देशमुख, एमआर मोहम्मद फैजान, पत्रकार मेहताब शाह,सोहिल खान,शेख तोहित,शेख साजिद,पत्रकार इरशाद अहमद,पत्रकार सैय्यद जमीर जेके,शेख अजीम,ओवैस सिद्दीकी रोशन दुंगे,शेख अलताफ,कल्पना इंगळे,विघा सुरेशी,सैय्यद निज़ाम,सईद खान,प्रशांत मेश्राम,सुहानी खान,इत्यादि ने खूप मेहनत घेतली या कार्यक्रमचा संचालन व आभार प्रदर्शन रुग्णसेवक रक्षण देशमुख,यांनी केले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.