रॅम कॉमप्रदर्शनाचे भूमिपूजन थाटात; विविध समित्यांचे गठन*
अकोला : बांधकाम, स्थापत्य व आर्किटेक्चर क्षेत्रातील नवबदल, अनुसंधनात्मक शोध,उपकरणीय अविष्कार आदर्दी विषयांच्या जनजागरणासाठी असो. ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स अकोला शाखा यांच्या वतीने व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचर अकोला यांच्या सहकार्याने दि 25 जानेवारी 27 जानेवारी पर्यंत स्थानीय मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मैदानात आयोजित तीन दिवसीय आयकॉन स्टील प्रस्तुत “रॅम्पकॉन 2025” प्रदर्शनीचे भूमिपूजन शनिवारी सकाळी मोठ्या थाटात संपन्न झाले. या भूमिपूजन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी गुजराती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष उमेश बगडीया होते. विदर्भ चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता, रुहाटीया गृपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ रुहाटीया यांच्या उपस्थितीत पूजन सोहळ्यात आयोजन सचिव अभिजित परांजपे व एसीसीईचे सचिव अनुराग अग्रवाल यांनी सहभाग घेतला. यावेळी एसीसीईचे चेयरमेन श्यामसुंदर साधवानी, कोषाध्यक्ष ़सदस्य पंकज कोठारी, इस्माईल नजमी आयआयएचे केंद्रीय सदस्य सुमित अग्रवाल, आयआयएचे चेअरमन कमलेश कृपलानी, सचिव सर्वे श केला, आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी जमिनीवर कुदळ प्रांगणातील चालवून रीतसर भूमिपूजन केले. नागरिक व व्यावसायिकांच्या उत्सुकतेचा विषय आज बांधकाम विश्व असून या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनीचा नागरिक मोठ्या संख्येने लाभ घेतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त करीत या उपक्रमास आपल्या शुभेच्छा प्रदान केल्यात. या नंतर मैदानात मंडप उभारणीस प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांचे आभार असीसीईचे सचिव अनुराग अग्रवाल यांनी मानलेत. दरम्यान या प्रदर्शनीच्या सफलतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यात स्टॉल बुकिंग समितीत अनुराग अग्रवाल, रिजवान कुरेशी, श्याम ठाकूर, इंद्रनील देशमुख, अमित राठी, सुमित अग्रवाल, सर्वेश केला, सागर हेडा, पाहुणे व्यवस्थापन समितीत नरेंद्र पाटील, राजेश लोहिया, संजय भगत, पंकज कासट, श्रीकांत घनोकार, विक्रम केजरीवाल, प्रतीक भारंबे, संजीव जैन, निमंत्रण समितीमध्ये प्रकाश ठोकळ, सुनील गुल्हाने, शैलेश मोदी, सय्यद अलाउद्दीन, एम चांदुरकर, जुरी व अवॉर्ड समितीमध्ये अजय लोहिया, नरेश अग्रवाल, जयप्रकाश राठी, अतुल बंग, मनोज मोदी, शैलेश वखारिया, तांत्रिक सत्र समितीमध्ये अजय लोहिया, इस्माईल नजमी, शैलेश अग्रवाल, विशाल तडस, बजरंग अंभोरे, नरेश चौधरी, मिलिंद जोत, ईश्वर आनंदानी, आयुष गुप्ता, शुभाश्री धनोकार, पियुशा जैन, रोहन चोपडे, ऋषभ रघुवंशी, रोहन काटकोरिया डिझायनिंग समितीमध्ये श्याम ठाकुर, निखिल गावंडे, मयूर सिंघानिया, निलेश मालपाणी, नेहा भैया, गौरव साधवानी, मीडिया व्यवस्थापन मध्ये पंकज कोठारी, कपिल ठक्कर, कुशल जैन, इंद्रनील देशमुख, किरण देशपांडे, अमित राठी, सागर हेडा, पवन अलसेट, निखिल बजाज, लेआउट व लँडस्केप व्यवस्थापन समितीत श्याम ठाकूर, चन्द्रशेखर मुखेडकर, शिवाजी भोरे, श्रेयस सावजी, गौरी शर्मा, निराग हेडा, ग्राउंड मॅनेजमेंट समितीत प्रदीप अग्रवाल, संजय अग्रवाल, गिरीश गुप्ता, पंकज भटकर, शिरीष वरणकार, राजेश घटाळे, अमोल महाजन, राजेश राऊत, अमित फोकमारे, प्रतीक भारंबे, तथा फूड मॅनेजमेंट समितीमध्ये इस्माईल नजमी, संजय भगत, सुमित अग्रवाल, निखिल बजाज, अंकुश खंडेलवाल आदी पदाधिकारी सेवा देत आहेत. या भूमिपूजन सोहळ्यात एसीसीई, आय आयएचे पदाधिकारी, उद्योजक, स्टॉलधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.