सामाजिक हळदी कुंकू करून मोरे कुटुंबाने दिव्यांग सोशल फाउंडेशन ला केले सहकार्य*
Akola B7
सामाजिक हळदी कुंकू करून मोरे कुटुंबाने दिव्यांग सोशल फाउंडेशन ला केले सहकार्य
अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर निरंतर राबवले जात आहेत . हळदी कुंकाच्या वाणात देण्यासाठी दिव्यांगांनी तयार केलेल्या विविध वस्तू डॉ.अर्चना मोरे ,डॉ. हेमंत मोरे व स्वाती मोरे यांनी गणेश नगर स्थित दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोल्याच्या कार्यालयातून खरेदी केल्या. तेव्हा संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांनी मोरे कुटुंबाला सामाजिक हळदीकुंकू करण्याचे सुचवले . दिव्यांग बांधवांना सहकार्य करण्यासाठी सामाजिक हळदीकुंकू साजरे करण्याची संकल्पना मोरे कुटुंबाने प्रत्यक्षात आणली .मोरे सोनोग्राफी व मॅटर्निटी हॉस्पिटल, रामनगर अकोला येथे दि १८ जानेवारी २०२५ रोजी या सामाजिक हळदी कुंकाचे आयोजन मोठ्या जल्लोषात करण्यात आले .या सामाजिक उपक्रमात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या विविध शोभिवंत वस्तू व पूजा साहित्याचे प्रदर्शन व विक्रीसाठी विशेष स्टॉल उभारण्यात आला .या सामाजिक उपक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ.वंदना पटोकार, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.दिपाली शुक्ल, डॉ . पद्मावती कोरपे, स्वाती मोरे व डॉ.अर्चना मोरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. विशाल कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोल्याच्या सामाजिक उपक्रमाची माहिती उपस्थित महिलांना दिली. दिव्यांग शिक्षण रोजगार व आरोग्यासाठी आपण सुद्धा या संस्थेला आपल्या परिसरात आमंत्रित करू शकता व दिव्यांगांना मोठे सहकार्य करू शकता असे सांगितले .राजश्री देशमुख यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या वतीने समाजात सकारात्मक ऊर्जा निर्मिती घडते असे वक्तव्य केले.या अनमोल कार्यासाठी डॉ. विशाल कोरडे यांचे कौतुक देखील केले.देशमुख महिला मंडळातर्फे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोल्याच्या विविध सामाजिक उपक्रमात आम्ही महिलावर्ग नेहमीच प्रतिसाद देऊ असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले*. आयोजक डॉ.अर्चना मोरे यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या कार्याला आम्ही पुढे नेऊ आणि समाजाने सुद्धा अशा प्रकारच्या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आव्हान केले . डॉ.हेमंत मोरे यांनी या सामाजिक उपक्रमातून मोरे कुटुंबाला मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली . अकोल्यातील सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर महिलांनी या हळदीकुंकू समारंभाला उपस्थित राहून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या स्टॉल वरून विविध वस्तूंची खरेदी केली . नचिकेत मोरे यांनी सदर उपक्रमात संगीत मैफिल आयोजित करून चित्रपट गीतांचे बहारदार सादरीकरण केले .दिव्यांग नोंदणी व दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमाला आपल्या परिसरात आमंत्रित करण्यासाठी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान अनामिका देशपांडे यांनी केले . या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नीता वायकोळे,नेहा पलन, अस्मिता मिश्रा, विजय कोरडे, संजय पागधुणे,रेखा इंगोले,कुंदा वाकोडे,नंदा डामरे,पायल बाठे यांनी सहकार्य केले . या आगळ्यावेगळ्या सामाजिक हळदीकुंकवाची चर्चा व कौतुक अकोलेकर करीत आहेत .