अभ्यासात उंच भरारी घेण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी काळजी घेण्याची गरज – मोहम्मद रफिक सिद्दीकी
AB7News
अभ्यासात उंच भरारी घेण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी काळजी घेण्याची गरज – मोहम्मद रफिक सिद्दीकी
अकोला – स्थानिक खदान जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठप्राथमिक आदर्श शाळा अकोली येथे शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आणि पालक मेळावा १० ते १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानाहून बोलतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासात उंच भरारी घेण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी केले.शा,लेय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राथमिक जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी रतनसिंग पवार यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सादिक अली, खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे होते तर आमद बाबा, इर्शाद हुसेन, जमील खान, जफरभाई एमझेड, अनीस भैया, रेशु पहेलवान, अलीम कॉन्ट्रॅक्टर, नईम भाई फर्निचरवाले, शेख युनूस, शेख चांद, सलीम शाह, तबरक शाह, रहीम मोद्दीन खतीब, निसार भाई, जावेद कॉन्ट्रॅक्टर, अहमद साहेब, युनूस ठेकेदार, सलमान भाई, आसीफोद्दीन खतीब, नजीर ठेकेदार, इम्रान ठेकेदार प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा अकोलीचे अध्यक्ष मन्नान सिद्दीकी, उपाध्यक्ष एहसान दानिश, हाजी मोहम्मद जाफर सिद्दीकी महानगरपालिका शाळा क्र. ९ चे शाळा समितीचे अध्यक्ष शेख मुजीब, राहिसा बी, शाकिर भाई याच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जमील खान यांनी केले.