ताज्या घडामोडी

दहावी- बारावीची परीक्षा : कॉपीमुक्त अभियान राबविणार भरारी पथकांनी सजग राहण्याचे निर्देश

AkolaB7

> दहावी- बारावीची परीक्षा : कॉपीमुक्त अभियान राबविणार

 

> *भरारी पथकांनी सजग राहण्याचे निर्देश*

अकोला : दहावी व बारावीच्या परीक्षेत कुठेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे, तसेच भरारी पथकांनी सजग राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले. परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांनी यंत्रणेचा गुरूवारी बैठकीद्वारे आढावा घेतला. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर उपस्थित होत्या. परीक्षेच्या महत्वाच्या पेपरच्या दिवशी तीन सदस्यीय केंद्रस्तरीय निरीक्षण (बैठे) पथक नेमावे. त्यात एका महिला सदस्याचा समावेश असावा. केंद्रांवर क्रीडांगण, व्हरांडा, वर्गखोली असे किमान तीन सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. परीक्षेची व्यापक प्रसिद्धी करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. इयत्ता बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारीपासून, दहावीची दि. २१ फेब्रुवारीपासून होत आहे. जिल्ह्यातील ८८ केंद्रांवर २५ हजार ५६९ विद्यार्थी बारावीची आणि ११९ केंद्रांवर २५ हजार ८५७ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत,

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.