> *नियोजनभवनात अधिकारी- कर्मचा-यांनी घेतली मतदारदिनाची शपथ*
अकोला, दि. 24 : ‘मतदान अनन्यसाधारण आहे, मी मतदान करणारच’ (नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर) ही थीम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदारदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी सर्व अधिकारी- कर्मचा-यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत नियोजनभवनात हा कार्यक्रम झाला. प्रशासकीय कामकाज अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सातकलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्याची प्रत्येक कार्यालयात अंमलबजावणी व्हावी. स्वच्छता, गतिमान कार्यपद्धती, कार्यालयीन शिस्त, स्नेहपूर्ण वातावरणनिर्मिती, याचा अवलंब सर्व कार्यालयांनी करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. लोकसभा निवडणूकीतील कामात पुरस्कार मिळाला असून, सर्वांच्या समन्वय, सहकार्या व योगदानामुळे जिल्ह्याला हा गौरव प्राप्त झाला, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.