- अकोट शहरात पोलिसांची हेल्मेट जनजागृती रॅली
अकोट : सार्वजनिक सुरक्षितताव प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांचे मार्गदर्शनाखाली १ फेब्रुवारी रोजी शहरातील प्रमुख मार्गाने पोलिस विभागाने हेल्मेट जनजागृती रॅली काढून नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले. या रॅली दरम्यान हेल्मेट घाला, सुरक्षित प्रवास करा आणि आपल्या स्वतःच्या कुटूंबासाठी हेल्मेटचा वापर करा असे आवाहननागरिकांना करण्यात आले. सदर रॅलीचे नेतृत्व अनमोल मित्तल सहायक पोलीस अधीक्षक अकोट उपविभाग यांनी केले. रॅलीमध्ये पोलीस निरीक्षक अमोल माळवे, पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, पोलीस स्टेशन अकोट शहर वअकोट ग्रामीणयेथील वाहतुक अंमलदार यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सदर रॅली पोलीस स्टेशन अकोट शहर येथून निघून अकोला नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मच्छी मार्केट, अंजनगाव रोड, धारोळीवेस, आंबोडी वेस, रामटेकपुरा, शौकतअली चौक, मोठे बारगण, बळीराम चौक, सोमवारवेस, यात्रा चौक, नरसिंग रोड, सोनु चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने फिरुन परत पोलीस स्टेशन अकोट शहर येथे येवून समारोप करण्यात आला. मागील वर्षामध्ये जेवढे नागरिक मर्डरमध्ये मृत्यू पावले नसतील त्यापेक्षा अधिक नागरिकांनी हेल्मेट न वापरल्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. नागरिकांनी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर केल्यास जीवदान मिळु शकते त्यामुळे वाहन चालवितांना नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा असे नागरिकांना पोलिस विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे.