मेडिकल स्टोअर्स’ला ३० दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ठेवणे आवश्यकअन्न व औषध प्रशासनाचे आवाहन`
AB7
मेडिकल स्टोअर्स’ला ३० दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ठेवणे आवश्यकअन्न व औषध प्रशासनाचे आवाहन`
अकोला, दि. 30 : औषध दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य असून, किमान 30 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज संग्रही ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व औषध दुकानदारांनी ही यंत्रणा तत्काळ बसवून घेण्याचे आवाहन जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. ही कार्यवाही सुरक्षा वाढविण्यासाठी, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि वैद्यकीय आस्थापनांबाबत जबाबदारी निश्चित करण्यासाठी आवश्यक आहे. सीसीटीव्ही यंत्रणा प्रवेशद्वार, बाहेर पडण्याचे ठिकाण, प्रतीक्षा कक्ष, बिलिंग काउंटर आणि इतर महत्त्वाच्या भागांवर कार्यरत असणे आवश्यक आहे, असे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांनी अद्यापही आपल्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेली नाही त्यांनी लवकरात लवकर सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच 30 दिवसांचे फुटेज संग्रह आणि यंत्रणा नेहमी कार्यरत ठेवून आवश्यकतेनुसार तपासणीसाठी प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले.