महाराष्ट्रियन गोंधळी लोककलेची संस्कृती कर्नाटकात जपणारे डॉ. व्यंकप्पा सुगतेकर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.* > *”महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेकडून त्रिवार अभिनंदन
AB7
> *महाराष्ट्रियन गोंधळी लोककलेची संस्कृती कर्नाटकात जपणारे डॉ. व्यंकप्पा सुगतेकर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.*
> *”महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेकडून त्रिवार अभिनंदन”*
वाशिम : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केन्द्रशासनाने पद्म,पद्मभूषण व पद्मश्री विजेत्या भाग्यवान पुरस्कारार्थींच्या नावाची घोषणा केली असून त्यामध्ये कर्नाटक राज्यातील बागलकोट-कलबुर्गी येथील डॉ.व्यंकप्पा अंबादास सुगतेकर ह्या गोंधळी लोककलावंताची ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे वृत्त महाराष्ट्रात येऊन धडकताच,डॉ व्यंकप्पा अंबाजी सुगतेकर ह्या गोंधळी लोककलावंताच्या निवडीमुळे आम्हा गोंधळी समाजाची मान उंचावली असल्याचे वाशिम जिल्ह्याचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी म्हटले असून आमच्या करीता सदर वृत्त भूषणावह असून अभिमानास्पद असल्याचे सांगतांना,लवकरच आम्हा महाराष्ट्रियन गोंधळ्यांचे एक शिष्टमंडळ त्यांच्या स्वागत सत्कारासाठी जाणार असल्याचे कळवीले आहे.याबाबत अधिक वृत्त असे की,मातृशक्ती उपासकांच्या मातृशक्ती आई तुळजाभवानीच्या पूजेमधील आद्यपूजा म्हणजे “गोंधळ-जागरण” पूजा होय. आई भवानीची पूजाविधी संपन्न करणारा गोंधळी समाज भटक्या जमातीमध्ये मोडणारा असून, देशपातळीवर त्यांची अल्पशी लोकसंख्या आहे.हा समाज आपल्या उपजिवीकेकरीता सततची भटकंती करीत गोंधळ-जागरण ह्या लोककलेचे कार्यक्रम करीत असतो.व त्या कलेमधून व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन,आध्यात्म्य व सुसंस्काराचा प्रचार प्रसार करीत समाजप्रबोधन- जनजागृती करून आपला उदरनिर्वाह करीत असतो.छत्रपती शिवरायांच्या काळात ह्या समाजाचे तोताराम गोंधळी यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेत हातभार लावल्याचा इतिहास असून गोंधळ्याच्या सहकार्याने तानाजी मालुसरे व मावळ्यांनी गोंधळी लोककलेच्या शस्त्राने कोंढाण्यासारखे बलाढ्य किल्ले जिंकल्याचा इतिहास आहे.अशा ह्या ऐतिहासिक व पारंपारिक काळातील गोंधळी समाजामधून कर्नाटक राज्यातील बागलकोट कलबुर्गी येथील सुप्रसिध्द गोंधळी लोककलावंत डॉ.व्यंकप्पा अंबाजी सुगतेकर यांची सन २०२५ च्या पद्मश्री पुरस्काराकरीता केन्द्रशासनाकडून निवड करण्यात आली आहे.त्यांचे बद्दल सांगायचे झाल्यास, डॉ.व्यंकप्पा अंबाजी सुगतेकर यांनी आजतागायत सहा दशकभर म्हणजेच ६७ वर्षे सतत १५० पेक्षा जास्त कथेच्या रचनेद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या गोंधळ जागरण लोककला कार्यक्रमांची प्रस्तूती करून, महाराष्ट्रियन गोंधळी लोककलेला देश पातळीवर नेऊन इतिहास घडवीला आहे.त्याबद्दल त्यांना शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय त्यांना कर्नाटक लोकसाहित्य विद्यापिठाची मानद् डॉक्टरेट मिळालेली असून, इ.सन २०१७ मध्ये कर्नाटक राज्य सरकारचा लोककथाश्री हा राज्यस्तरिय पुरस्कार मिळाला आहे.इ.सन २०२४ मध्ये दूरचित्रवाणीवरील “मन की बात” कार्यक्रमामधून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते.हे येथे उल्लेखनिय होय.त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाल्यामुळे वाशिम जिह्याच्या महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,अहिल्यानगर जिल्ह्यातील परशुराम हिंदु सेवा संघ लोककला विभागाचे महाराष्ट्र समन्वयक तथा गोंधळी समाज संघटनेचे शाहिर शिवाजीराव शिंदे, महिला विभागाच्या शितल शिवाजी शिंदे,कु. धनश्री पोपटलाल पोखर्णा,अनुराग शिवाजी शिंदे,कोल्हापूर येथील लोककलाकार संघटनेचे अध्यक्ष शाहिर विलासराव पाटील,अकोला जिल्ह्यातील गोंधळी समाज संघटनेचे प्रदिप सोनोने,सुधाकर इंगोले,संजय शिंगनाद,अकोटचे शाहिर विजय पांडे,अमरावतीचे गोंधळी समाज संघटनेचे अनिल साळुंके,शाहिर गोपाल मुदगल,चंद्रपूर जिल्ह्यातील गोंधळी समाज संघटनेचे दिवाकर बावणे,अखिल भारतिय मराठी नाट्य मंडळ मुंबईचे नंदकिशोर कव्हळकर,वैदर्भिय नाथ समाज संघटनेचे एकनाथ पवार,शाहिर देवमन मोरे जय भवानी जय मल्हार गोंधळी संच कारंजाच्या महिला कलावंत कांताबाई लोखंडे,इंदिराबाई मात्रे इत्यादींनी त्यांचे हर्षोल्हासात स्वागत व अभिनंदन केले असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातून लोककलावंताचे शिष्टमंडळ त्यांच्या सत्कार व भेटीकरीता जाणार असल्याचे वृत्त लातूरचे राजेंद्र वनारसे यांनी कळवले आहे