श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या अध्यक्षपदी शैलेंद्र उर्फ बंटी कागलीवाल यांची निवड*
AB7
> *श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या अध्यक्षपदी शैलेंद्र उर्फ बंटी कागलीवाल यांची निवड*
अकोला : विश्व हिंदू परिषद द्वारा संचालित, श्रीराम नवमी शोभायात्रा अकोला शहरात नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य स्वरूपात व उत्साहात साजरी करण्यात येणार आहे, 1986 ला जेव्हा राम मंदिराचे ताले उघडल्या गेले होते तेव्हापासून संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषद च्या माध्यमातून रामनवमी शोभायात्रा सुरू करण्यात आल्या व तेव्हापासूनच अकोल्यात रामनवमी शोभायात्रा सातत्याने करण्यात येत आहे सुरुवातीच्या काळात छोट्या प्रमाणात सुरू झालेली शोभायात्रेने अकोल्याचे लोकप्रिय दिवंगत आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या प्रयत्नातून गतकाळात शोभायात्रेने भव्य स्वरूप घेतले आहे, देशभरातील ह्या शोभायात्रा श्रीराम जन्मभूमी आंदोलनाची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जातात, व त्याचा परिणाम गतवर्षी 22 जानेवारीला भव्य दिव्य स्वरूपात नव्याने बांधलेल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात श्रीराम लला च्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, त्यामुळे राम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह देशभरात निर्माण झालेला आहे यावर्षी श्रीरामनवमी शोभायात्रा अकोला शहरात अत्यंत आस्थेने व रामभक्तीने ओत-प्रोत होऊन साजरी केली जाणार आहे, विश्व हिंदू परिषद द्वारे संचालित या रामनवमी शोभायात्रे मधे लाखोच्या संख्येने अकोलेकर सहपरिवार सम्मिलित होतात व त्याचे स्वरूप दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या प्रमाणे वाढत आहे दरवर्षी वेगवेगळ्या प्रतिष्ठित, गणमान्य व रामभक्त व्यक्तींना रामनवमी शोभायात्रा अध्यक्षपदी नियुक्त केल्या जाते, त्याच अनुषंगाने या वर्षीचे अध्यक्ष म्हणून श्री बंटी उर्फ शैलेंद्रजी कागलीवाल यांची निवड करण्यात आली, बंटी कागलीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात त्यांची रामनवमी शोभायात्रा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अनेक पदाधिकारी व शहरातील गणमान्य व्यक्ती व व्यापारी बंधू उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने वि.हिं.प.प्रांत सहमंत्री गणेश काळकर, विश्व हिंदू जनकल्याण परिषदेचे प्रांत अध्यक्ष राहुलजी राठी, वि.हिं.प. अकोला जिल्हाअध्यक्ष प्रकाशजी लोढीया, बजरंग दल प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार , रामनवमी शोभायात्रा समितीचे मार्गदर्शक अशोक गुप्ता व वसंत बाछुका, कृष्णा गोवर्धनजी शर्मा, ब्रिजमोहनजी चितलांगे, विहिप विभाग मंत्री संजय दुबे, विभाग संयोजक हरिओम पांडे , अमर कुकरेजा, राजूभाऊ मंजुळकर, निलेश पाठक, रामप्रकाश मिश्रा, शैलेश खरोटे, प्रकाश घोगलिया, गोविंद कागलीवाल, नवीन गुप्ता, संजय अग्रवाल, संदिप निकम, रितेश चौधरी, योगेश खंडेलवाल, रोशन जैन, आकाश ठाकरे, संतोष बोर्डे, मनोज कस्तुरकर, रेखाताई नालट अर्चनाताई शर्मा, पुष्पाताई वानखडे, संदिप वाणी ,बाळ बिडवई , मनीष बाछुका, विलास अनासने, नितीन जोशी, संतोष शर्मा, मनीषाताई भुसारी ,कल्पना अडचुले, सारिका देशमुख, मालती रणपिसे, छाया तोडसाम, संगीता जानोरकर, चित्राताई बापट सर्व कार्यकर्ते, महिला आणि सदस्य उपस्थित होते.